Escort Site वर बायको, बहिणीचे फोटो; ऑनलाइन मसाज सेवा शोधताना मुंबईतील व्यक्तीस धक्का
मुंबईतील एका व्यक्तीस मात्र या गोष्टी इंटरनेटवर करताना मोठा धक्का बसला. सदर व्यक्ती एका एस्कॉर्ट साईट ( Escort Sites) वर ऑनलाईन मसाज सेवा शोधत होता. या वेळी त्याला या साईटवर चक्क आपल्याच बायको आणि बहिणीचे फोटो आढळून आले.
ऑनलाईन पॉर्न (Online XXX), ऑनलाईन मसाज सेवा (Online Massage Services) याबाबत इंटरनेटवर शोध घेणे अनेकांसाठी नवे नाही. मुंबईतील एका व्यक्तीस मात्र या गोष्टी इंटरनेटवर करताना मोठा धक्का बसला. सदर व्यक्ती एका एस्कॉर्ट साईट ( Escort Sites) वर ऑनलाईन मसाज सेवा ( Escort Site For Massage Services) शोधत होता. या वेळी त्याला या साईटवर चक्क आपल्याच बायको आणि बहिणीचे फोटो (Wife Photos) आढळून आले. अशा प्रकारच्या साईटवर आपल्याच रक्ताच्या नात्यातील लोकांचे फोटो पाहून हा व्यक्ती चांगलाच गांगरुन गेला. दरम्यान, त्याने तातडीने पोलिसांमध्ये या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत एका महिलेला अटक केले आहे. जी कथितपणे एस्कॉर्ट आणि मसाज वेबसाइटवर सोशल मीडियावरून (Social Media) महिलांचे फोटो पोस्ट करत असते असा तिच्यावर आरोप आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईतील खार परिसरातून एक 31 वर्षीय व्यक्ती ऑनलाईन मसाजर शोधत होता. शोध घेता घेता हा व्यक्ती एका एस्कॉर्ट वेबसाइटवर पोहोचला. जेथे त्याला अनेक महिला आणि तरुणींची छायाचित्रे पाहायला मिळाली. धक्कादायक म्हणजे इतर महिला आणि तरुणींची छायाचित्रे पाहता पाहता त्याला आपलयाच पत्नी आणि बायकोची छायाचित्र हाती लागली. सदर व्यक्तीने हे फोटो आपली पत्नी आणि बहिणीला दाखवले असता त्यांनी साधारण चार वर्षांपूर्वी अशा प्रकारचे फोटो काढल्याचे आणि सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगितले.
दरम्यान, पीडित व्यक्तीने त्याच साईटवर दिलेल्या एका संपर्क क्रमांकाशी संपर्क साधला. ज्यावर समोरुन एका महिलेकडून प्रतिसाद आला. त्या महिलेने त्या व्यक्तीस खार पश्चिम येथील एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. हा व्यक्तीही त्या महिलेला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेला. परंतू, महिलेला संशय आल्याने तिने त्याला मारहाण केली आणि हॉटेलमधून पळ काढला. परंतू, आरोपीने महिलेला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन अटक केली आहे. रेश्मा यादव असे महिला आरोपीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही महिला एस्कॉर्ट आणि मसाज वेबसाइटवर सोशल मीडियावरून सुंदर महिलांची छायाचित्रे अपलोड करणाऱ्या टोळीचा भाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.