मुंबई: चर्नी रोड स्थानकात मोबाईल चोराचा पाठलाग करणं बेतलं जीवावर; अपघाती मृत्यू (Watch Video)

शकील शेख हे गोरेगाव येथून चर्चगेट ट्रेनमध्ये चढले होते. या ट्रेनमध्ये दरवाज्याच्या बाजूला बसले होते. अचानक त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन चोर पळाला मात्र शकील त्याचा पाठलाग करताना दरवाज्यातून खाली पडला आणि जिन्याजवळच्या कठड्याला आपटला. या अपघातानंतर त्यांचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला आहे.

मुंबई: चर्नी रोड स्थानकात मोबाईल चोराचा पाठलाग करणं बेतलं जीवावर; अपघाती मृत्यू (Watch Video)
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई लोकलमध्ये मोबाईल चोराचा पाठलाग करताना 53 वर्षीय शकील शेख या इसमाचा पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात चर्नी रोड स्टेशन जवळ घडल्याची माहिती समोर आली असून त्याचं सीसीटीव्ही फूटेज आता समोर आलं आहे. शकील शेख हे गोरेगाव येथून चर्चगेट ट्रेनमध्ये चढले होते. या ट्रेनमध्ये दरवाज्याच्या बाजूला बसले होते. अचानक त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन चोर पळाला मात्र शकील त्याचा पाठलाग करताना दरवाज्यातून खाली पडला आणि जिन्याजवळच्या कठड्याला आपटला. या अपघातानंतर त्यांचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला आहे. Western Railway Monsoon Helpdesk: दादर, मुंबई सेंट्रल सह 7 रेल्वे स्थानकांवर पश्चिम रेल्वे देणार मुंबईकरांना मोफत छत्री आणि व्हिलचेअर ची सोय

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार शकील हे जोगेश्वरी येथे राहणारे 53 वर्षीय चर्चगेट कडे जाणारी लोकलमध्ये सकाळी चढले. सुमारे 6.45 वाजता लोकल चर्नी रोड स्थानकात पोहचताच आरोपी मोबाईल हिसकावून धावत्या लोकलमधून फलाटावरून पसार झाला मात्र शकील यांचा अंदाज चुकला आणि ते आपटले.

आता दिवसें दिवस मुंबई लोकल मधील प्रवास असुरक्षित होत असल्याचं चित्र समोर येत आहे. शकील हे त्यांच्या घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती.

(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2019 03:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).