Mumbai: मालाड मधील अक्सा बीचवर आढलेल्या महिलेच्या मृत्यूचे गुढ उकलण्याची शक्यता, पोलीस करतायत नवऱ्याच्या चौकशीची प्रतिक्षा

मात्र आता मृत महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी मुंबई पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

Mumbai:  मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एका महिलेचा मृतदेह बंदुकीच्या बॅगेत सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र आता मृत महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी मुंबई पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. तसेच आता महिलेचा पती बिहारला गेला असून त्याच्या चौकशीची सुद्धा मुंबई पोलिसांकडून प्रतिक्षा केली जात आहे. नंदिता ठाकूर राय अशी मृत महिलेची ओळख पटली आहे. ती एक गृहिणी असून कांदिवली पूर्व येथे राहणारी होती.(Mumbai: मालाड मधील अक्सा बीचवर महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ, अधिक तपास सुरु)

नंदिता ही या महिन्याआधी बेपत्ता झाली होती. तर ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात का दाखल केली नाही असा सवाल पोलिसांनी सासऱ्यांना केला आहे. नंदिता हिचा पंकज राय सोबत काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तिचे सासरे या दांम्पत्यांसोबतच राहत होते. पंकज आणि नंदिता यांना अद्याप मुलबाळ झालेले नाही. तर पंकज हा एका दुकानात काम करतो.(Pune Murder Case: कर्जदारांपासून सुटका मिळण्यासाठी स्वत: च्या मृत्यूचं नाटक रचून आरोपीने केली मित्राची हत्या; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण)

छट पूजेच्या दरम्यान पंकज हा बिहार मधील आपल्या गावी निघून गेला असून अद्याप तो परतलेला नाही. हा प्रकार धक्कादायक असून बायको बेपत्ता झाली तरीही तो मुंबईत परतलेला नाही. तर परिवारात काही भांडण होते का याचा सुद्धा पोलिसांकडून आता तपास केला जात आहे. तसेच महिलेच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये तिचे लैंगिक शोषण केले नसल्याचे सांगण्यात आले आहे.