मुंबई: कर्नाटकातील आमदारांनी राजीनामा मागे घ्यावा, सोफीटल हॉटेल बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार यांनी मुंबईत (Mumbai) धाव घेतली असून सध्या ते सोफीटल हॉटेलमध्ये थांबले आहेत.
कर्नाटक (Karnataka) मधील काँग्रेस (Congress) पक्षाच्या 8 आणि जेडीएसच्या (JDS) तीन आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार यांनी मुंबईत (Mumbai) धाव घेतली असून सध्या ते सोफीटल हॉटेलमध्ये थांबले आहेत. मात्र काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी सोफीटल हॉटेलाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत असल्याचे दिसून आले.
तर कर्नाटकातील आमदारांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. या प्रकरणी महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सूरजसिंह ठाकूर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व प्रकारामुळे सोफीटलच्या बाहेर कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासूनच काँग्रेसमध्ये राजीनाम्याचे सत्र सुरु असून आता पर्यंत 13 आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कर्नाटकातील कुमारस्वामी यांचे सरकार धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.