मुंबईकरांना दिलासादायक बातमी! 500 चौरस फूटांपर्यतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ, राज्य मंत्रिमंडळात 18 महत्त्वाचे निर्णय

मुंबई ठाणे या भागातील 500 चौरस फुटांपर्यंतची घर मालमत्ता करातून वगळण्यात आली आहेत.

Maharashtra government waives off property tax on houses upto 500 sq.ft in Mumbai and Thane (Photo credit : commons.wikimedia)

येत्या काही दिवसातच लोकसभा (Lok Sabha Election) निवडणूका तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक लोकप्रिय निर्णयांची घोषणा सुरू आहे. आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये (Maharashtra State Cabinet) 18 मह्त्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे मुंबईतील (Mumbai)  500 चौरस फूटांपर्यतच्या घरांवरील

मालमत्ता कर (property tax ) माफ करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आज अनेक मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई ठाणे या भागातील 500 चौरस फुटांपर्यंतची घर मालमत्ता करातून वगळण्यात आली आहेत. याबाबतचा ठराव महापालिकेने मंजूर केला होता मात्र त्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे प्रलंबित होता. आज अखेर त्याला मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच राज्य मंत्रिमंडळाने स्वयंपुनर्विकास धोरणालाही मंजुरी दिली आहे. रखडलेले SRA प्रोजेक्ट म्हाडाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई - ठाणे येथील 10 लाख कुटुंबांना फायदा मिळणार आहे. SRA ट्रांझिट कॅम्पमधील घुसखोरांना दंड ठोठावला जाण्याबाबतही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत 40,000 सोसायटींपैकी सुमारे10 लाख परिवार प्रकल्पबाधित आहेत. त्यापैकी राज्यात 25 लोकसभा आणि 190 विधानसभा मतदारसंघ शहरी आणि निमशहरी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर स्वयंपुनर्विकास धोरणालाही मंजुरी देणे फायद्याचं ठरणार आहे.