Mumbai Lockdown: मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता, शहरात लॉकडॉउनसह संचारबंदीची गरज नाही- महापालिका आयुक्त इक्बाल चहल

त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करण्यासह मास्क घालावे असे वारंवार आवाहन केले जात आहे,

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

Mumbai Lockdown: राज्यासह मुंबईत शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करण्यासह मास्क घालावे असे वारंवार आवाहन केले जात आहे, अशातच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहेच. पण अन्य काही ठिकाणी संचारबंदीसह लॉकडाऊन ही लागू करण्यात आला आहे. परंतु महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहता तरीही लॉकडाऊन आणि संचारबंदी बद्दल एक मोठे विधान केले आहे.(Covid-19 Vaccine चे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन होणे बंधनकारक नाही- BMC) 

इक्बाल सिंह चहल यांनी असे म्हटले आहे की, शहरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढतोय. मात्र लॉकडाऊन आणि संचारबंदीची काहीच गरज वाटत नाही आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु रुग्णांची संख्या वाढत असताना चहल यांनी केलेल्या विधानामुळे आता सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या असतील हे नक्कीच. याबद्दल मुंबई मिररला दिलेल्या एका मुलखतीत चहल यांनी हे विधान केले आहे.(Pune: यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयातील 15 डॉक्टरांसह 10 नर्सला COVID19 ची लागण)

दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून 2 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचसोबत धारावीत सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाली आहे. अशातच चिंता व्यक्त केली जात आहेच. पण चाचण्यांची संख्या सुद्धा वाढवण्यात आल्याची माहिती गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. तर महापालिका सुद्धा दाटीवाटीच्या ठिकाणी आणि कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरलेल्या विभागात विविध निर्बंध लागू करत आहे. सध्या कोरोनाच्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून नागरिकांना लसीचा डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे.