Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! न्यू इयरच्या मुहूर्तावर रात्रभर लोकल धावणार
न्यू इयर सेलिब्रेशनच्या रात्री मुंबईत रात्रभर लोकल सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय लोकल रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
थर्टी फस्ट सेलिब्रेट करण्यासाठी मुंबई उपनगरातून अनेक जण मुंबई शहरात सेलिब्रेशनसाठी येतात. दादर, मरिन लाईन्स, चर्चगेट, गेट वे ऑफ इंडिया, जूहू बिच, गिरगाव चौपाटी या भागात पार्टी किंवा फेरफटका मारायला येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. तसेच ख्रिसमस-न्यू इयरचा मुहूर्त साधत मुंबईत दाखल झालेल्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. याच पार्श्वभुमिवर मुंबई लोकल रेल्वे कडून एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. न्यू इयर सेलिब्रेशनच्या रात्री मुंबईत रात्रभर लोकल सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय लोकल रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईतील रहिवाशांसह मुंबई उपनरातील नागरिकांना थर्टीफस्ट नाईटला प्रवास करणं सहज होणार आहे. तरी मुंबई लोकलच्या फक्त पश्चिम रेल्वेकडून हा निर्णय घेम्यात आली आहे. मध्य किंवा हार्बर रेल्वे कडून याबाबत ची कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नसुन ठराविक वेळापत्रकानुसार लोकल ट्रेन धावणार आहे.
पश्चिम रेल्वे कडून वाढीव लोकल रेल्वेचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. तरी नवीन वर्षाच्या रात्री आठ वाढीव लोकल रेल्वे धावणार आहे. यांत चर्चगेट ते विरार चार लोकल ट्रेन आणि विरार ते चर्चगेट चार लोकल ट्रेनचा समावेश आहे. तरी पालघर, वसई, विरार या उपनगरातून मुंबईत न्यू इयर सेलिब्रेशनसाठी दाखल होणाऱ्या नागरिकांसाठी या वाढीव लोकल रेल्वेमुळे प्रवास करणं सोयिस्कर होणार आहे. (हे ही वाचा:- Mumbai Police: मुंबई पोलिसांकडून दोन रशियन युट्युबर्सविरोधात गुन्हा दाखल)
तरी मध्य रेल्वेवर देखील वाढीव लोकल ट्रेन धावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, कसारा, बदलापूर या भागातून देखील नागरिक मोठ्या संख्येने मुंबई शहरात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी येतात पण ठरावीक लोकल वेळेमुळे प्रवास करण्यास अडचण निर्माण होते. तरी मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावर देखील वाढीव लोकल रेल्वे धावणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.