Mumbai Local Update: मुंबई लोकल प्रवासासाठी वेळेची मर्यादा तुर्तास कायम
त्यामुळे वेळेच्या मर्यादेसह सर्वसामान्यांसाठी रेल्वेसेवा सुरु करण्यात आली. त्यानंतर रेल्वेसेवा पूर्णवेळ सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली. मात्र रेल्वे प्रवासासाठी वेळ मर्यादा तुर्तास कायम राहणार आहे.
मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना बाधितांचा आकडा नियंत्रणात येत होता. त्यामुळे वेळेच्या मर्यादेसह सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा (Local Service) सुरु करण्यात आली. त्यानंतर लोकल सेवा पूर्णवेळ सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली. मात्र गेल्या 10 दिवसांत रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे तुर्तास मुंबई लोकल प्रवासासाठी वेळेची कायम राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. (Mumbai Local प्रवासासाठी वेळेच्या निर्बंधामुळे व्यावसायिकांकडून कामकाजाच्या वेळेत बदल)
मुंबईतील नियंत्रणात येत असणारी कोरोनाग्रस्तांची संख्या आणि प्रवाशांची गैरसोय पाहता 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास खुला करण्यात आला. मात्र यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळाले. 1 ते 10 फेब्रुवारीपर्यंतचा आढावा घेतल्यास दररोजच्या रुग्ण संख्येत 200 चे 225 ने चढउतार दिसून आले. लोकल प्रवासासाठी वेळेची मर्यादा असली तरी प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या देखील वाढत आहे.
यावर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, सध्याची रुग्णवाढ रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे होत आहे, असे ठोस सांगता येणार नाही. आम्ही चाचण्यांची संख्या वाढल्याचाही हा परिणाम असू शकतो. मात्र रुग्णवाढीमुळे लोकल प्रवासावरील वेळेची मर्यादा कायम ठेवण्याचे आणि त्यात कोणतीही वाढ न करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला देण्यात आले आहेत. (Varsha Gaikwad On Mumbai Local: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, विद्यार्थ्यांना मुंबई लोकल प्रवासाची मिळू शकते मुभा)
दरम्यान, सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलसेवा सुरु केल्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे का, याचा आढावा प्रशासन घेत आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत हा आढावा घेण्यात येणार असून तोपर्यंत लोकलच्या वेळा न वाढवण्याचे निर्देश रेल्वेला देण्यात आले आहेत, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई शहरात सध्या 5252 सक्रीय रुग्ण आहेत. रिकव्हरी रेट 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा दर 533 दिवसांवर पोहचला आहे. तर कोविड वाढीचा दर 0.13 टक्के इतका आहे.