Mumbai Local: मुंबईत सर्वसामान्य लोकलने प्रवास कधी करणार? महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले 'हे' उत्तर
त्यामुळे शहरातील लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र कोरोनाची अद्याप परिस्थिती कायम असून नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
Mumbai Local: मुंबई कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होत असल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शहरातील लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र कोरोनाची अद्याप परिस्थिती कायम असून नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. अशातच आता मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार याची वाट पाहिली जात आहे. अशातच आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई लोकलबद्दल एक मोठे विधान केले आहे.(Covid-19 Vaccination in Mumbai: 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण आजपासून सुरु; मुंबईत 'या' केंद्रावर मिळणार लस)
किशोरी पेडणेकर यांनी मुंबई लोकलबद्दल असे म्हटले की, अद्याप सर्वसामान्यांसाठी लोकलने प्रवास करण्यास बंदी आहे. तर मुंबईतील कोरोनाचा संसर्ग कमी होत आहेच. पण रुग्णांचा आकडा सुद्धा कमी झाल्यास लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यासंदर्भात विचार करु असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
मुंबईत 600 पेक्षा कमी रुग्णांचा आकडा सध्या आढळून येत आहे. तसेच धारावीत एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. त्याचसोबत वरळीत काल एकच रुग्ण मिळाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने रुग्णांचा आकडा सुद्धा कमी होणे गरजेचे आहे. त्यानंतरच सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्यास मुभा असणार आहे. लोकल सुरु करण्यााबद्दल कोणाच्या जीवाला धोका पोहचणार नाही याचा सुद्धा विचार केला जाणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.(Pune Weekend Lockdown: पुण्यात विकेंडला 'या' सेवा राहणार बंद)
दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होतोय पण लसीकरण अधिकाधिक होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर देशासह राज्यात 16 जानेवारी पासून कोविड-19 लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक, फ्रंटलाऊन वर्कर्स, दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील नागरिक, तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले. त्यानंतर 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सुरु करण्यात आले. मात्र लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे काही लसीकरण केंद्रांवर या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण बंद होते. केवळ 45 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरु ठेवण्यात आले होते. त्यानंतर आजपासून 30-44 वयोगटासाठी लसीकरणची सुविधा खुली करण्यात आली आहे. त्याचबरोबर 21 जून पासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरु होणार आहे