Mumbai Local Update: मध्य रेल्वेवर ठाणे-दिवा नव्या मार्गिकेचं PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार लोकार्पण; 36 नव्या फेर्या धावणार
सीएसएमटी ते कल्याण मार्गावर सध्या 10 लोकल चालवल्या जात जात आहेत. त्यामध्ये अजून 34 लोकल्सची वाढ करून 44 एसी लोकल लवकरच धावतील.
ठाणे- दिवा स्थानका (Thane-Diva) दरम्यान 5व्या,6व्या मार्गिकेमुळे 36 नव्या लोकल फेर्या वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने (Central Railway) घेतला आहे. या नव्या मार्गिकेच्या लोकापर्णाचा सोहळा शुक्रवार, 18 फेब्रुवारी दिवशी होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे. व्हीसी द्वारा ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि काही लोकप्रतिनिधी असणार आहेत.
मीडीया रिपोर्ट्सनुसार वाढीव 36 फेर्यांमध्ये 34 एसी लोकल तर 2सामान्य लोकलचा समावेश असणार आहे. सीएसएमटी ते कल्याण मार्गावर सध्या 10 लोकल चालवल्या जात जात आहेत. त्यामध्ये अजून 34 लोकल्सची वाढ करून 44 एसी लोकल लवकरच धावतील. तर हार्बर मार्गावर 16 एसी लोकल पूर्वीप्रमाणेच चालवल्या जाणार आहेत. नक्की वाचा: Mumbai Local Update: मध्य रेल्वेवर ठाणे-दिवा मार्गिकेचं काम पूर्ण करण्यासाठी अजून 5 मेगा ब्लॉक होणार .
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर 36 नव्या लोकल धावणार असल्याने एकूण फेर्यांची संख्या 1774 वरून 1810 होणार आहे. मुंबई लोकल ही मुंबईकरांसाठी लाईफलाईन समजली जाते. नक्की वाचा: Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खुशखबर! मार्चपासून 'मेट्रो 2 A’ आणि 'मेट्रो 7' मार्ग सुरु होण्याची शक्यता.
एसी लोकल सध्या तिन्ही मार्गांवर सुरू झाल्या असल्या तरीही भाडं अधिक असल्याने अनेकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आहे. अनेक प्रवाशांनी भाडं कमी करण्याच्या देखील सूचना रेल्वे प्रशासनाकडे केल्या आहेत. दरम्यान अद्याप त्यावर कोणता ठोस निर्णय झालेला आहे. रेल्वे अर्धवातानुकुलित ट्रेन्स चलवण्याचादेखील विचार करत असल्याचं समोर आलं आहे.