Mumbai Local Trains Update: मुंबई उपनगरीय लोकल ट्रेन पुन्हा सुरु होणार? मध्य रेल्वे तर्फे देण्यात आले 'हे' स्पष्टीकरण
या सर्व चर्चांवर आता मध्य रेल्वे (Central Railway) तर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अद्याप याबाबत कोणतीही सूचना मिळालेली नाही, ती मिळताच सर्व प्रवाशांना त्वरित माहिती दिली जाईल असे यामध्ये सांगण्यात आले आहे.
मुंबई (Mumbai) सह महाराष्ट्रात अनलॉक 1 (Unlock 1) अंतर्गत अनेक सेवा सुविधा पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्या आहेत. खाजगी कार्यालये, धार्मिक स्थळे, मुंबईतील बेस्ट बस सुविधा सर्व काही आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन (Mumbai Local) कधी सुरु होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी महाविकासाआघाडी तर्फे मुंबई लोकल सेवा निदान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तरी सुरु करता यावी यासाठी विनंती करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबाबत केंद्र सरकार कडे सुद्धा विचारणा केली होती. सोबतच सोशल मीडियावर सुद्धा याबाबत अनेक मॅसेज व्हायरल होत होते, या सर्व चर्चांवर आता मध्य रेल्वे (Central Railway) तर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अद्याप याबाबत कोणतीही सूचना मिळालेली नाही, ती मिळताच सर्व प्रवाशांना त्वरित माहिती दिली जाईल असे यामध्ये सांगण्यात आले आहे. Coronavirus Update: महाराष्ट्रातील तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. काही दिवसानापासून मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेन पुन्हा सुरु करण्याबाबत चर्चा आहेत मात्र आम्हाला याबद्दल अद्याप सूचना मिळालेल्या नाहीत, अधिकृत सुचना मिळताच सर्व प्रवाशांना सूचित केले जाईल असे या ट्विट मध्ये म्हंटलेले आहे.
पहा ट्विट
दरम्यान, मुंबई च्या लोकल ट्रेन मधून सर्व दिवशी लाखो प्रवासी प्रवास करतात. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे कोणतेही नियम पाळणे हे जवळपास अशक्यच आहे. साहजिकच यामुळे सर्वांच्याच जीवाला धोका होऊ शकतो हीच बाब लक्षात घेता मागील दोन महिन्यांपासून या ट्रेन बंदच आहेत. दुसरीकडे आता बेस्ट बस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत, यामध्येही एका बस साठी केवळ ३५ प्रवासी असे नियम घालण्यात आले आहेत, तरीही अजून अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत आहे, अशात ट्रेन सुरु करणे किती योग्य असेल याबाबत महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेईल हे बघायचे आहे.