IPL Auction 2025 Live

Mumbai Local Train: मुंबई मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड, लोकल वाहतुकीस अर्धा तास विलंब, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या लोकल (Mumbai Local Trains) गाड्या सुमारे 15 ते 30 मिनीटे उशीराने धावत आहेत. परिणामी कामावर जाणाऱ्या मुंबईकर प्रवासांचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.

Mumbai Local | (File Image)

मुंबई मध्य (Mumbai Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Mumbai Western Railway) मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या लोकल (Mumbai Local Trains) गाड्या सुमारे 15 ते 30 मिनीटे उशीराने धावत आहेत. परिणामी कामावर जाणाऱ्या मुंबईकर प्रवासांचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.

प्राप्त माहितीनुसार कल्याणहून सीएसएमटी अशा अप मार्गाने जाणाऱ्या गाड्या विशेष धिम्या गतीने धावत आहेत. त्यामुळे अप मार्गावरील काही गाड्या रद्दही करण्यात आल्याचे समजते. परिणामी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. डाऊन दिशेने कसाऱ्याकडे जाणारी मालगाडी उशीराने धावल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. सिग्नल यंत्रणेत बिगाड झाल्याने रेल्वे विलंबाने धावत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावरही अंधेरी- जोगेश्वरी स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे समजते. (हेही वाचा, Mumbai Local Update: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अंधेरी-जोगेश्वरी दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड, दोन्ही मार्गावरील फास्ट लोकल रखडल्या)

लोकल गाड्या अचानक उशीरा धावू लागल्याने प्रवाशांना प्रवाशांचा खोळंबा झाला. बराच वेळ जाऊनही लोकल ट्रेन वेळेत न आल्याने प्रवाशांचा मनस्ताप वाढत आहे. तांत्रिक बिघाड दूर करुन शक्य तितक्या लवकर वाहतूक पूर्ववत करण्याचा रेल्वे प्रशासानाचा प्रयत्न आहे. त्यामुळे बिघाड कधी दुरुस्त होणार आणि वाहतूक पूर्ववत होऊन आपल्या निश्चित प्रवासासाठी कधी निघणार याची वाट प्रवासी पाहात आहेत.

दुसऱ्या बाजूला पश्चिम रेल्वे मार्गावरही वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. प्रामुख्याने अंधेरी- जोगेश्वरी स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे समजते. त्यामुळे एकाच वेळी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे अशा दोन्ही मार्गावर बिघाड झाल्याचे वृत्त आहे. परिणामी मुंबईतील दोन रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे.