IPL Auction 2025 Live

Mumbai Local Trains: सर्वसामान्य नागरिकांसाठी उद्यापासून मुंबई लोकल सेवा सुरु; कोणत्या वेळेत करता येणार प्रवास? पाहा संपूर्ण वेळापत्रक

मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व सामान्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी नव्हती. अखेर मुंबईची लाइफलाईन असलेली लोकल सेवा उद्यापासून (1 फेब्रुवारी) सर्वांसाठी सुरु होत आहे.

Mumbai Local (Photo Credit - PTI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलमधून (Mumbai Local Trains) प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व सामान्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी नव्हती. अखेर मुंबईची लाइफलाईन असलेली लोकल सेवा उद्यापासून (1 फेब्रुवारी) सर्वांसाठी सुरु होत आहे. याबाबत राज्य सरकारने शुक्रवारी घोषणा केली होती. दरम्यान, गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्व सामान्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे कोणत्या वेळेत सर्व सामान्यांना प्रवास करता येणार? यासाठी खालील माहिती अधिक फायदेशीर ठरणार आहे.

दरम्यान, सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे, सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवेने प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व सामन्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे देखील वाचा- Mumbai - Pune Expressway Viral Video: गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा खुलासा 'चौघांनाही अटक, बंदूक दाखवणारे 'ते' शिवसैनिक नव्हेत'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सेवेला परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र, 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मुंबई लोकलमधून प्रवास करता येईल. तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय, मुंबई आणि उपनगरातील विविध कार्यालये आणि आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वांना सोयीचे होईल, असेही आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.