Mumbai Local News: रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; हे वेळापत्रक वाचूनच प्रवासासाठी बाहेर पडा

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी रविवारी २७ ऑक्टोंबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक (Local Mega Block) घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी ते अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी तिन्ही मार्गांवरील प्रवाशांचे हाल होणार आहेत. (Anil Deshmukh Autobiography: अनिल देशमुख यांच्या 'Diary of a Home Minister' मधील काही पाने सोशल मीडियावर, राजकीय वर्तुळात खळबळ)

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 पर्यंत असेल. ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट- मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. तर, लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच चर्चगेटसाठी असेल्या काही लोकल फेऱ्या वांद्रे/दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेर्मि नेटेड/रिव्हर्स केल्या जातील.

हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेलहून ठाणेकरिता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाण्याहून पनवेलकरिता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जातील. या ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी /नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाइन सेवा उपलब्ध असेल.