Coronavirus च्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल, मेट्रो, मोनोरेल होणार बंद? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय

मुंबई लोकलच्या सेवा काही दिवस बंद करण्यात याव्यात अशी मागणी केली जातेय, यावर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती देतां संबंधित विषयावर आजच्या मंत्रमंडळ बैठकीत चर्चा करून मगच निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे.

Local Train | Representational Image | (Photo Credits: File Photo)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रातील अनेक नेत्यांकडून राज्यात लॉक डाऊन (Lock Down) केले जावे अशी मागणी समोर येत आहे. सरकारने सध्या तरी शाळा, महाविद्यालये, मंदिर, पर्यटन स्थळे, मॉल या सर्व सार्वजनिक ठिकाणी संचारास बंदी घातली आहे, तसेच मुंबई, पुणे (Pune) , नागपूर (Nagpur) मध्ये जमावबंदीचे आदेश देखील देण्यात आले आहेत, मात्र अशातही मुंबई लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल (Mumbai Local) , मेट्रो (Metro) आणि मोनोरेल (Monorail) तसेच BEST सेवा अजूनही पूर्वीसारखीच कार्यरत आहे. वास्तविक याच जागा अधिक रहदारीच्या असल्याने इथे संसर्ग पसरण्याची अधिक शक्यता आहे, त्यामुळे अनेक ठिकाणहून या मुंबई लोकलच्या सेवा काही दिवस बंद करण्यात याव्यात अशी मागणी केली जातेय, यावर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती देतां संबंधित विषयावर आजच्या मंत्रमंडळ बैठकीत चर्चा करून मगच निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे.

राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, मुंबईची लोकल बंद करणे हा निर्णय सर्वच बाजूंनी रास्त नाही यामुळे अनेकांची पंचाईत होऊ शकते परिणामी वाहतुकीचा सर्वात मोठा आणि सोप्पं मार्ग बंद झाल्याने लोकांच्या समस्या वाढू शकतात, मात्र अशावेळी निदान गर्दी कमी व्हावी यासाठी काहीतरी योजना करण्याचा विचार मात्र नक्कीच सुरु आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम चा पर्याय आपापल्या कर्मचाऱ्यांना दिल्याने थोडीफार गर्दी ओसरायला मदत होईल, याबाबत खाजगी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला जात आहे.

पहा ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी आज मुंबई शहरात गेल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पाहायला मिळतेय. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात आज 64 वर्षीय वृद्ध रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, वास्तविक या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असूनही त्याचा मृत्यू केवळ कोरोनानें झाला की त्यामागे पुर्वाजारही कारणीभूत आहेत याचा तपास सुरु आहे. राज्यात सध्या दुसऱ्या स्तरावर कोरोनाचा प्रसार झाला आहे हा स्तर वाढू नये यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत असे आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.