Mumbai Local Megablock: मुंबईत रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई लोकलच्या (Mumbai Local) तिनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेवर (Central Railway) मेगाब्लॉक (MegaBlock) घेण्यात येणार आहे. माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, तसेच हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक असणार नाही. मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे. (हेही वाचा - Mumbai Stations Names To Be Changed: मुंबईतील 'या' 8 रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलली जाणार; केंद्राकडे पाठवला जाणार प्रस्ताव, खासदार Rahul Shewale यांची माहिती)
मध्य रेल्वेवर माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
कुर्ला ते वाशी अप-डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला तसेच पनवेल ते वाशीदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक असणार नाही.