Mumbai Local Mega Block: रविवारी हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

मात्र लोकल सेवच्या यंत्रणेची देखभाल आणि दुरूस्ती महत्त्वाची आहे. त्यासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो.

Mumbai Local (Photo Credits: PTI)

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल  (Mumbai Local) सेवा कोविड-19 संकटामुळे मर्यादीत कालावधीत सर्वसामान्यांसाठी सुरु आहे. मात्र लोकल सेवच्या यंत्रणेची देखभाल आणि दुरूस्ती महत्त्वाची आहे. त्यासाठी दर रविवारी मेगाब्लॉक (Mega Block) घेतला जातो. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. परंतु, मेगा ब्लॉकचे वेळापत्रक जाणून घेतल्यास प्रवासाचा खोळंबा टाळता येईल. दरम्यान, या रविवारी (14 मार्च) देखील सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे.  तर जाणून घेऊया मेगाब्लॉकचे वेळापत्रक:

14 मार्च रोजी असणारा मेगाब्लॉक हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर असेल त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर त्याचा परीणाम होणार नाही. तरी प्रवाशांनी सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत कुर्ला ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्ग बंद राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.34 ते दुपारी 03.39 दरम्यान वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन लोकल्स धावणार नाहीत. तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सकाळी 10.21 ते दुपारी 03.41 दरम्यान सुटणाऱ्या अप मार्गावरील रेल्वे सेवाही बंद राहमार आहे. परंतु, मेगा ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल्स चालवल्या जातील.

ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी / नेरुळ अप आणि डाऊन रेल्वे सेवा सकाळी 11.10 ते सायंकाळी 04.10 या वेळेत बंद ठेवण्यात येईल. ठाणे येथून सकाळी 10.35  ते सायंकाळी 4.19 दरम्यान वाशी, नेरुळ आणि पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल्स धावणार नाहीत. पनवेल, नेरूळ आणि वाशी येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या लोकल्स देखील सकाळी 10.12 ते सायंकाळी 04.09 या वेळेत बंद असतील.