Mumbai Local Mega Block on 10 November: मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक; जाणून घ्या आजचं मुंबई लोकलचं वेळापत्रक

मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज तुम्ही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर हे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

मुंबईची लाईफलाईन असाणारी मुंबई लोकलाच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज (10 नोव्हेंबर) मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे मुंबईत आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणार्‍या मुंबईकरांना मेगा ब्लॉकचं वेळापत्रक बघूनच बाहेर पडावं लागणार आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून काही विशिष्ट मार्गांवर विशेष ट्रेन्सची सोय करण्यात आली आहे. मात्र दर आठवड्याला रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिकी काम करण्यासाठी सकाळी 11 ते 4 दरम्यान मुंबई लोकलचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज तुम्ही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर हे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर मुलुंड - माटुंगा अप जलद मार्ग सकाळी 11.30 वाजल्या पासून दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक आहे. या दरम्यान कल्याण येऊन सुटणार्‍या गाड्या

दिवा आणि परळ स्थानकामध्ये धीम्या लाईनवर चालवल्या जातील. सोबतच दादर - रत्नागिरी पॅसेंजर गाडीदेखील दिवा स्थानकापर्यंतच चालवली जाणार आहे.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वे मार्गावर देखील आज मेगाब्लॉक आहे. पनवेल - वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्ग सकाळी ११.३० वा. पासून दुपारी ४.०० वा. पर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते पनवेल, बेलापूरला जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जातील. दरम्यान प्रवाशांच्या सोयीसोसाठी सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्ग

पश्चिम रेल्वे जलद मार्गावर असलेल्या ब्लॉकमुळे या मार्गावरील लोकल सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावर चालवल्या जातील. काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी 10.30 ते 3.35 दरम्यान मेगा ब्लॉक आहे.

मुंबई हे शहर 365 दिवस आणि 24 तास काम करणारं आहे. त्यामुळे आज तुम्हांला मुंबईत प्रवास करायचा असेल तर रेल्वे शिवाय इतर पर्यायी मार्गांचा विचार करावा लागेल. आज ठराविक चालवल्या जाणार्‍या लोकलमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दीची शक्यता आहे.