Mumbai Local Mega Block: मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गांवर आज 'ब्लॉक' जाणून घ्या कुठल्या मार्गावर किती वाजता?
दरम्यान मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, हार्बर लाईनच्या प्रवाशांना ब्लॉक च्या काळात म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवासाची अनुमती असेल.
मुंबई लोकल (Mumbai Local) साठी आज (26 डिसेंबर) मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे विकेंडसाठी बाहेर पडणार असाल तर आज मुंबई मध्ये कोणत्या मार्गावर किती वेळ आणि कसा मेगा ब्लॉक (Mega Block) आहे? हे जाणून घेऊनच प्लॅनिंग करा. दरम्यान सध्या मुंबई लोकल मध्ये कोविड 19 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच युनिव्हर्सल पासच्या आधारे रेल्वे तिकीट दिले जात आहे. मग आज तुम्ही रेल्वे प्रवास करणार असाल तर पाहा मुंबई लोकलचं मेगाब्लॉक वेळापत्रक.
पश्चिम रेल्वे मार्गावर आज ट्रॅक सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी बोरीवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर 10.55 ते 3.35 तासांपर्यंत जंबो ब्लॉक घेतला जाणार आहे.
पश्चिम रेल्वे ट्वीट
मध्य रेल्वे मार्गावर सीएसटीएम ते विद्याविहार या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते 3.55 या वेळेमध्ये मेगा ब्लॉक असणार आहे. डाऊन हार्बर मार्गावर सीएसटीएम ते चुनाभट्टी/ वांद्रे या मार्गावर सकाळी 11.40 ते संध्याकाळी 4.40 तसेच चुनाभट्टी/ वांद्रे ते सीएसएमटी अप मार्गावर सकाळी 11.10 ते 4.10 या वेळेत मेगाब्लॉक राहणार आहे.
सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान फास्ट ट्रॅकवरून चालवल्या जाणार्या रेल्वेच्या फेर्या आज कुर्ला, सायन, माटुंगा, परेल, दादर, भायखळा या स्थानकांवर देखील थांबवली जाणार आहे. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी/ वडाळा ते वाशी, बेलापूर, पनवेल साठी सोडल्या जाणार्या तसेच सीएसएमटी ते वांद्रे/ गोरेगाव साठी सोडल्या जाणार्या डाऊन हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा बंद राहणार आहेत. हे देखील वाचा: Mumbai Local: सेंट्रल रेल्वेत एसी लोकलची संख्या वाढण्याची शक्यता .
मध्य रेल्वे ट्वीट
दरम्यान मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, हार्बर लाईनच्या प्रवाशांना ब्लॉक च्या काळात म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवासाची अनुमती असेल.