IPL Auction 2025 Live

Mumbai Local Stunt Viral Video: मुंबई लोकलमध्ये स्टंट करणे पडले महागात; तरुणाने एक पाय आणि हात गमावला, मध्य रेल्वेने केलं ‘हे’ आवाहन

लोकल ट्रेनच्या दारात लटकून तरुण स्टंट करताना दिसतो आहे. लोकल सुरु झाली आहे. त्या धावत्या लोकलमधल्या एका डब्याच्या खांबाला पकडून हा तरुण प्लॅटफॉर्मवर पाय ठेवून वेगाने जाताना दिसतो आहे.

धावत्या लोकलच्या दरवाजात लटकून फलाटावर पाय घासत स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुंबईच्या  शिवडी स्टेशनवरचा हा व्हिडिओ होता. पोलिसांनी लागलीच त्याची दखल घेतली. पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला. त्याचवेळी तरुणाची ओळख पटली. त्याला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले. घरी पोहचल्यावर पोलिसांना देखील धक्का बसला.  दुसऱ्या एका स्टंटमध्ये या तरुणाला एक हात आणि पाय गमावावा लागला आहे. त्यामुळे आता त्याने असे स्टंट करु नका असं आवाहन केलं आहे. मध्य रेल्वेने (Mumbai) या तरुणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. (हेही वाचा - Freight Train Cars Derailed At Boisar: बोईसर मध्ये मालवाहू गाडीचे डब्बे घसरले, वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला; पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत)

पाहा व्हिडिओ -

फरहत आझम शेख असं या तरुणाचं नाव आहे. लोकल ट्रेनच्या दारात लटकून तरुण स्टंट करताना दिसतो आहे. लोकल सुरु झाली आहे. त्या धावत्या लोकलमधल्या एका डब्याच्या खांबाला पकडून हा तरुण प्लॅटफॉर्मवर पाय ठेवून वेगाने जाताना दिसतो आहे. त्याला डब्यातले लोक सांगत आहेत की असं करु नकोस तरीही तो कुणाचंही ऐकत नाही. हा त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडीओतल्या या तरुणाचा मध्य रेल्वेकडून शोध सुरु होता. जेव्हा या तरुणाचा शोध लागला तेव्हा त्याने एक पाय आणि एक हात गमावला. शिवडीमध्ये स्टंट केल्यानंतर या तरुणाने आणखी एका ठिकाणी स्टंट केला. त्यामुळे त्याला त्याचा हात आणि पाय गमावावा लागल्याचे समोर आले आहे.