Mumbai Water Storage: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मध्य वैतरणा तलाव 90 टक्के भरला
यामुळे मात्र मागील 15 दिवसांतील तलावांमधील पाणीसाठा 75 टक्क्यांवर म्हणजे सुमारे 11 लाख दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचला आहे.
राज्यभरात सध्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. गेल्या आठवडाभरापासून मुंबईत (Mumbai) पावसाचा जोर आणखीच वाढला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. एकीकडे धरणाच्या पाणीसाठ्यात (Dam Water Storage) मोठी वाढ झाली असली तरी मुंबईत काही भागात अद्यापही 10 टक्के पाणीकपात ही लागू आहे. जुलै महिन्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे मात्र मागील 15 दिवसांतील तलावांमधील पाणीसाठा 75 टक्क्यांवर म्हणजे सुमारे 11 लाख दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचला आहे. (हेही वाचा - Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाणीकपात रद्द होणार?)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून रे 11 लाख दशलक्ष लीटर पाणी साठा जमा झाला आहे. आनंदाची बाब म्हणजे हा पाणीसाठा एकूण साठवण क्षमतेच्या 75 टक्क्यांच्या वर आहे. धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने आता पाणीकपात रद्द करण्याबाबतचा निर्णय केव्हा घेतला जाणार याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. मुंबईत सध्या 10 टक्के पाणीकपात सुरू आहे.