IPL Auction 2025 Live

लेडिज बार, हुक्का पबसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शासकीय प्रमुखांची नावे

मुंबई महानगरपालिका उपाधिकारी अजॉय मेहता (Ajoy Mehta) यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शासकीय प्रमुखांची नावे वापरुन लेडिज बार आणि हुक्का पब चालविले जात असल्याचे एक सर्टिफिकेट त्यांच्या हाती लागले आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits: PTI)

मुंबई महानगरपालिका उपाधिकारी अजॉय मेहता (Ajoy Mehta) यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शासकीय प्रमुखांची नावे वापरुन लेडिज बार आणि हुक्का पब चालविले जात असल्याचे एक सर्टिफिकेट त्यांच्या हाती लागले आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या नावे एक लेडिज बार आणि रेस्टॉरंट सुरु असल्याचे प्रकरण सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. तर दुकाने किंवा रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी काही योजना आहेत. परंतु हुक्का पबवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून अद्याप लेडिज बार आणि रेस्टॉरंट बद्दल अद्याप संभ्रम कायम आहे.

मेहता यांना मिळालेले सर्टिफिकेट हे महानगरपालिकेकडून बनवण्यात आले असल्याचे उघडकीस आले आहे. तर अशा पद्धतीचे सर्टिफिकेट बनवण्यासाठी नाव, पत्ता, व्यवसायाची पद्धत, व्यवसाय करणाऱ्यांचे पॅन कार्ड क्रमांक आणि इ-मेल क्रमांक दाखवणे अत्यावश्यक असते. परंतु अजॉय मेहता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावे लेडिज बार आणि हुक्का पब चालविले जात असल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या नावे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(हेही वाचा-मुंबई: पाटलाग करुन तरुणीचे जबरदस्तीने चुंबन; आरोपीला अटक)

तर मेहता यांच्या नावे बनवण्यात आलेल्या सर्टिफिकेटबद्दल एमआरए मार्ग पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावे असणाऱ्या तक्रारीची नोंद गावदेवी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली आहे. तर गुमस्ता लायसन्स युनियनच्या सदस्यांनी असे म्हटले की, महापालिकेने व्यवसाय सुरु करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा सुरु केली होती. मात्र त्यामध्ये काही त्रुटींचा उपयोग करुन सर्टिफिकेट हे कप्युटरच्या माध्यमातून बनवले गेले असून याबद्दल कोणतेही वेरिफिकेशन करण्यात आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.