कुर्ला रेल्वेस्थानकातील पाचदारी पुल दुरुस्तीच्या कारणामुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून काही दिवस बंद

मुंबईत काही दिवसांपूर्वीच सीएसएमटी (CSMT) येथील पाचदारी पूल कोसळून पडल्याची दुर्घटना घडली होती.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईत काही दिवसांपूर्वीच सीएसएमटी (CSMT) येथील पाचदारी पूल कोसळून पडल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेडून पादचारी पुलाची तपासणी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाने त्यांच्या हद्दीमधील पुलांच्या दुरुस्तीसाठी पूल बंद करण्यात आले आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कुर्ला (Kurla) स्थानकातील पादचारी पूल काही दिवसांसाठी बंद केला आहे. तसेच पूलाचे काम पूर्ण झाल्यानंतरच प्रवाशांना येथून जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. मात्र अचानक कुर्ला स्थानकातील पूल बंद केल्याने प्रवाशांची मोठी गर्दी होत असून याचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. त्याचसोबत गर्दीच्या नियोजनासाठी कोणत्याही पद्धतीची सुविधा करण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.(हेही वाचा-सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता एस.एफ. काकुळते यांना अटक)

तत्पूर्वी गर्दीमुळे एल्फिस्टन स्थानकावरील पादचारी पूलावर चेंगराचेंगरीचा प्रकार घडला होता. यामध्ये अनेक प्रवाशांवर मृत्यू ओढवल्याची दुर्घटना घडली होती. त्यामुळे आता सुद्धा कुर्ला स्थानकावर होणारी गर्दी पाहून या घटनेची पुनरावृ्त्ती होऊ नये अशी अपेक्षा केली जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif