गोरेगाव : ७ व्या मजल्यावरून पडून पत्रकाराचा मृत्यू ,घातपात की अपघात पोलिसांचा तपास सुरु
गोरेगाव येथे ७ व्या मजल्यावरून पडून ४९ वर्षीय आदर्श मिश्रा या पत्रकाराचा मृत्यू
मुंबईत आज पत्रकार दिनीच एका इंग्रजी वृत्तपत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. गोरेगाव येथे राहणाऱ्या आदर्श मिश्रा (Adarsh Mishra) यांचा राहत्या घराच्या इमारती टेरेसवरून पडून मृत्यू झाला आहे. आदर्श मिश्रा हे सातव्या मजल्यावरून खाली पडले. त्यांना नजीकच्या सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये (Siddharth Hospital) दाखल करण्यात आले होते मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी त्याच्या मृत्यूचे कारण अपघाती निधन असे नमूद केले आहे.
आदर्श मिश्रा यांनी सुमारे १८ वर्ष पत्रकार क्षेत्रामध्ये काम केले आहे. मुंबईतील प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रकामध्ये आदर्श हे Vice President म्हणून काम करत होते. तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी वृत्तपत्राच्या वाईस प्रेसिडंटपदाचा राजीनामा दिला होता. सध्या पोलीस तपास सुरु आहे. आदर्श नियमित त्यांच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर मॉर्निग वॉक साठी जात असत. आजही ते मॉर्निंग वॉकला गेले असताना गच्चीतून खाली कोसळले. हा अपघात आहे की घातपात याबाबत पोलीस तपास करत आहेत.
आदर्श मिश्रा हे गोरेगाव येथे सिद्धार्थ नगरमध्ये कुटुंबासोबतच राहत होते. 'VIVA इस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च' या संस्थेचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे.