मुंबईतील महापालिकेच्या 9 रुग्णालयांचे Non-COVID सेंटर्समध्ये रुपांतर करण्यात येणार
याच दरम्यान आता महापालिकेच्या शहरातील 16 पैकी 9 रुग्णालयांचे आता नॉन-कोविड सेंटर्समध्ये रुपांतर करण्यात आले आहे. कारण मान्सून मध्ये उद्भवणाऱ्या आजारांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे नागरि अधिकाऱ्यांनी शनिवारी स्पष्ट केले आहे. तर मुंबईतील महापालिकेचे केईएम, सायन आणि नायर रुग्णालयात कोविडसह अन्य आजारांसाठी उपचार दिले जाणार आहेत.
मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याच दरम्यान आता महापालिकेच्या शहरातील 16 पैकी 9 रुग्णालयांचे आता नॉन-कोविड सेंटर्समध्ये रुपांतर करण्यात आले आहे. कारण मान्सून मध्ये उद्भवणाऱ्या आजारांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे नागरि अधिकाऱ्यांनी शनिवारी स्पष्ट केले आहे. तर मुंबईतील महापालिकेचे केईएम, सायन आणि नायर रुग्णालयात कोविडसह अन्य आजारांसाठी उपचार दिले जाणार आहेत. त्याचसोबत शहरातील काही लहान रुग्णालये पावसाळ्याच्या काळात उद्भवणाऱ्या आजारांकडे लक्ष देणार आहेत.
जे रुग्ण या नऊ रुग्णालयांत उपचारासाठी येणार आहेत त्यांना अधिक उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी गोरेगावमधील नेस्को किंवा बीकेसी मधील एमएमआरडी येथे दाखल करण्यात येणार आहे. तर पावसाळ्याची सुद्धा आता सुरुवात झाली असून डेंग्यू, लेप्टो आणि मेलेरियाच्या रुग्ण वाढू शकतात. तर महापालिकेकडून नॉन कोविड प्राथमिक आरोग्य क्लिनिक आणि वैद्यकिय दवाखाने सुद्धा सुरु करण्यात येणार आहेत.सध्या महापालिकेच्या 16 रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यापैकी काही रुग्णालयात कोविड आणि नॉन-कोविड रुग्णांवर ही उपचार केले जात आहे. परंतु काही रुग्णालये काही खासकरुन कोविड सेंटर म्हणून घोषित केली आहेत.(मुंबईत यंदाच्या वर्षी मलेरियाच्या घटनांमध्ये किरकोळ वाढ झाल्याची महापालिकेची माहिती)
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यु, मलेरिया यांसारखे साथीचे आजार पसरत आहेत. त्यामुळे महापालिकेकडून सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे.तर काही दिवसांपूर्वीमहापालिकेने माहिती देत असे म्हटले होते की, जुन महिन्यात मलेरियाची 328 प्रकरणे समोर आली आहे. जी गेल्या वर्षात याच काळात 313 होती. तसेच चार डेंग्यूची प्रकरणे आणि एक लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण जून महिन्यात आढळले आहेत. तर 2019 मध्ये जुन महिन्यातच आठ डेंग्यू आणि पाच लेप्टोस्पायरोसिसरचे रुग्ण आढळून आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले होते.