कोविड-19 संकटाचा फटका मुर्ती व्यवसायालाही; 'गणेशोत्सवासाठी यंदा पुरेशा मुर्त्या बनवू शकलो नाही' म्हणत मुंबईतील मुर्तीकाराने मांडली व्यथा
मुर्त्या बनवण्याचा व्यवसायावरही या संकटाचा परिणाम झाला आहे. पुढील महिन्यात गणेश चतुर्थी हा सण मोठा सण येऊन ठेपला आहे. महिन्याभर आधीपासूनच गणेशोत्सवाची धामधूम सुरु होते. परंतु. यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर पाणी फिरले आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा फटका सर्व उद्योगधंद्यांना बसला आहे. मुर्त्या बनवण्याचा व्यवसायावरही या संकटाचा परिणाम झाला आहे. पुढील महिन्यात गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) हा सण मोठा सण येऊन ठेपला आहे. महिन्याभर आधीपासूनच गणेशोत्सवाची धामधूम सुरु होते. परंतु. यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. मुर्तीकारही पुरेशा गणपतीच्या मुर्ती बनवू शकत नाहीत. कोविड-19 च्या दहशतीमुळे मुर्ती कारखान्यात काम करणारे कामगार मुंबईला येण्यास तयार नाहीत. असे मुंबईतील (Mumbai) एका मुर्तीकाराने सांगितले आहे.
मुंबईतील सागर नामक मुर्तीकार म्हणतो की, "कामगार घाबरले आहेत. कोणीही मुंबईला परत येण्यासाठी तयार नाहीत. मी दरवर्षी 1200 मुर्त्या बनवतो. परंतु, यंदा 700 मुर्त्या देखील तयार करता आल्या नाहीत." इको-फ्रेंडली गणेशमुर्त्या बनवण्याचे सरकारने आवाहन केले आहे. परंतु, त्यासाठी वेळ देण्यात आला नाही. तसंच मुर्त्या बनवण्यासाठी मंडप उभारण्याची परवानगी देखील देण्यात आली नाही. त्यांनी घरी मुर्तीकाम करण्यास सांगितले आहे. पण आमची घरे तितकी मोठी नाहीत. विशेष म्हणजे वाहतुकीच्या समस्येमुळे मुर्त्या बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही, असे सांगत सागर यांनी आपली व्यथा मांडली. (गणेशोत्सव यंदा अत्यंत साधेपणाने; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना गणेश मंडळांना मान्य)
ANI Tweet:
दरम्यान कोरोना व्हायरस संकटामुळे यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तर मुंबईतील अनेक मंडळांनी गणेशोत्सवा ऐवजी आरोग्य उत्सव साजरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट असल्याने सण-समारंभात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.