Mumbai: शेजाऱ्यांसोबत भांडण्यासाठी नकार दिल्याने नवऱ्याकडून बायकोची हत्या तर सासूवर हल्ला

त्यानुसार शेजाऱ्यांसोबत कपडे वाळत घालण्यावरुन झालेल्या भांडणात बायकोने आणि सासूने साथ न दिल्याने नवरा आणखी संपप्त झाला.

Representative Image (Photo Credits: File Photo)

Mumbai: विरार पूर्व येथील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार शेजाऱ्यांसोबत कपडे वाळत घालण्यावरुन झालेल्या भांडणात बायकोने आणि सासूने साथ न दिल्याने नवरा आणखी संपप्त झाला. त्यानंतर त्याने बायकोची हत्या केली असून सासू वर हल्ला केल्याने ती जखमी झाली आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात एफआयआर दाखल केला असून त्याचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. सुप्रिया जगदीश गुरव असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपी जगदीश हा एका खाजगी कंपनीत काम करत असून तो वसई रेल्वेस्थानकाच्या बाहेर तिकिटांची विक्री करतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र ब्रम्हा कॉम्प्लेक्स येथे ही घटना घडली आहे. सासू सुशमा शेट्टी यांच्या मालकिचे घर असून जगदीश त्यांच्या येथे भाड्याने राहण्यासाठी गेला होता. तर घराच्या बाहेर कपडे वाळत घालण्यावरुन जगदीश याचे शेजाऱ्यांसोबत भांडण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने सुप्रिया आणि त्याच्या सासुला या भांडणात सहभागी होण्यास बोलावले. परंतु सुप्रिया ही कामात व्यस्त होती. तर त्याच्या सासूच्या घरात होता.(पालघर मध्ये 8 वर्षीय मुलीची हत्या; आरोपीचा शोध सुरु)

जगदीश याने बायकोला आणि सासूला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. शेट्टी यांनी त्याच्या बोलण्यावरुन सुनावले आणि त्याने त्यांचे डोके भिंतीवर आपटले. यामुळे सुप्रिया हिने त्याला पाठीमागे ढकलले असता त्याने किचन मधील चाकू घेत तिच्या छातीवर त्याने वार केले. शेट्टी यांनी त्याला तेव्हा अडवले असता त्याने त्यांच्या हातावर ही वार केला आणि तेथून पळून गेला.

या सर्व प्रकारामुळे शेजाऱ्यांची त्या दोघींना तातडीने नजीकच्या सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी त्यांना संजीवनी रुग्णालयात हलवण्यात सांगितले. तेथील डॉक्टरांनी सुप्रिया हिला मृत घोषित केले.

शेट्टी या घरकाम करतात आणि त्यांच्या पतीचे 2020 मध्ये निधन झाले. त्यानंतर सुप्रिया, जगदीश णि त्यांची तीन मुले ही शेट्टी यांच्यासोबत त्यांच्या घरी राहत असल्याचे पोलिसांनी म्हटले.शेट्टी यांनी केलेल्या तक्रारीनुसार जगदीश याला दारु पिण्याचे व्यसन होते.