Home Selling Rate Decreases: मुंबई - पुण्यात घराच्या विक्रीमध्ये मोठी घट जाणून घ्या कारण?
एप्रिल ते जून या कालावधीत या घरांची विक्री 6 टक्क्यांनी घसरून 1,13,768 युनिट्सवर आली असून आधीच्या जानेवारी-मार्च या पहिल्या तिमाहीत ती 1,20,642 युनिट्स होती.
मुंबईतील घरांच्या विक्रीत 8 टक्क्यांची घसरण झाली असल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉम या डिजिटल रियल इस्टेट ब्रोकरेज कंपनीने केलेल्या तिमाही विश्लेषणात असे दिसून आले आहे. प्रॉपर्टी ब्रोकरेज प्लॅटफॉर्म प्रॉपटायगर हा हाऊसिंग डॉटकॉमच्या मालकीच्या आरईए इंडियाचा एक भाग आहे. कंपनीने ‘रियल इनसाइट रेसिडेन्शियल – एप्रिल-जून 2024’ अहवालात घरांची मागणी आणि पुरवठा यासंबंधीची तिमाही आकडेवारी जाहीर केली आहे. मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि दिल्ली एनसीआर या शहरांचा समावेश आहे. (हेही वाचा- Report On Housing Prices: दिल्ली आणि मुंबईत घर खरेदी करणं झालं महाग! गेल्या पाच वर्षांत 50 टक्क्यांनी वाढल्या घरांच्या किमती)
एप्रिल ते जून या कालावधीत या घरांची विक्री 6 टक्क्यांनी घसरून 1,13,768 युनिट्सवर आली असून आधीच्या जानेवारी-मार्च या पहिल्या तिमाहीत ती 1,20,642 युनिट्स होती. तिमाही विक्रीत झालेली ही घट फक्त बंगळूर 30% वाढ) आणि दिल्ली-एनसीआर (10% वाढ) चा अपवाद वगळता देशात सर्वत्र दिसून आली. तर एप्रिल-जून तिमाहीत नवीन पुरवठा जानेवारी-मार्च कालावधीतील 1,03,020 वरून 1 टक्क्यांनी कमी होऊन 1,01,677 युनिट्सवर आला.
तिमाही आकडेवारीनुसार मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर)मध्ये घरांची विक्री 41,954 युनिट्सवरून 8 टक्क्यांनी घसरून 38,266 युनिट्सवर आली. तर पुण्यातील घरांची विक्री एप्रिल ते जून या कालावधीत 5 टक्क्यांनी घसरून 21,925 युनिट्सवर आली आहे, जी मागील तिमाहीत 23,112 युनिट्स होती. अहमदाबादमधील घरांची विक्री एप्रिल-जूनमध्ये 26 टक्क्यांनी घसरून 9,500 युनिट्सवर आली आहे जी यावर्षी जानेवारी-मार्च दरम्यान 12,915 युनिट्सवर होती.