मुंबईत कोरोनाबाधितांसह मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

याच दरम्यान आता मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांसह मलेरियाची सुद्धा प्रकरणे समोर येत आहेत.

( फोटो सौजन्य- गुगल)

मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून प्रशासनाकडून याच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासह रुग्ण आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांसह मलेरियाची सुद्धा प्रकरणे समोर येत आहेत. मरेलियाच्या रुग्णांची आकडेवारी ही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक असून रुग्णांची वाढ होत आहे. गेल्या वर्षात जुलै महिन्यात 438 मलेरियाची प्रकरणे समोर आली होती. मात्र यंदाच्या वर्षात मलेरियाची प्रकरणे दुप्पट झाली असून आकडा 872 वर पोहचला आहे.(महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरु करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

गेल्या काही आठवड्यांपूर्वी दोन जणांनी मलेरियामुळे आपला जीव गमावला आहे. त्याचसोबत त्यांना कोरोनाची सु्द्धा लागण झाली होती. वाढत्या रुग्णांचा परिणाम रुग्णालयाच्या क्षमतेवर सुद्धा होऊ शकतो. मलेरिया व्यतिरिक्त डेंग्यूचे सु्द्धा रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या वर्षात जुलै महिन्यात 29 प्रकरणे आणि तर यंदा 11 जणांना याचा फटका बसला आहे. 2019 मध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या होती पण त्यामुळे एकही जण दगावला गेला नाही.(Coronavirus In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 381 जणांना कोरोनाची लागण; 3 जणांचा मृत्यू)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयांनी सुद्धा स्पेशल केअरसह त्यांच्यासाठी वेगळे विभाग बनवण्याची गरज आहे. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा मान्य केले आहे की मलेरियाचे रुग्ण ही रुग्णालयात दाखल होत आहेत. डासांवर नियंत्रण मिळवण्यासह त्याचा प्रादुर्भाव पसरु नये म्हणून उपाय योजना करण्यात येत आहेत. तर फिजिशियन डॉ. हेमंत ठाकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना असे म्हटले आहे की, त्यांच्या हाताखाली एकूण 6 मलेरियाचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी एकाला कोरोनाची सुद्धा लागण झाली आहे.