Mumbai-Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर आरामबस उलटून 4 ठार, 23 जखमी; एकाच रस्त्यावर दिवसातील दुसरी घटना
मुंबई गोवा महामार्गावर आज 13 लोकांना प्राण गमवावे लागले. सिंधुदुर्गातील कणकवली (Kankavli Accident) येथे अरामबस उलटून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर 23 जण जखमी झाले. कणकवली येथे वागदे पुलानजीक ही घटना घडली.
मुंबई गोवा महामार्ग (Mumbai-Goa Highway Accident) अपघाताचा सापळा ठरतो आहे की काय? असा सवाल पुन्हा उपस्थित केला जात आहे. मुंबई गोवा महामार्गावर आज 13 लोकांना प्राण गमवावे लागले. सिंधुदुर्गातील कणकवली (Kankavli Accident) येथे अरामबस उलटून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर 23 जण जखमी झाले. कणकवली येथे वागदे पुलानजीक ही घटना घडली. आज दिवसभरात घडलेली ही दुसरी घटना आहे. मुंबई गोवा महामार्ग आज पहाटे रायगडजवळही एक अपघात घडला. या अपघातात 9 जणांना आपले प्रपाण गमवावे लागले.
प्राप्त माहितीनुसार, पहाटे 4 वाजणेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त झालेली आरामबस खासगी मालकीची होती. गडनदी पूलावर आल्यावर चालकाचे बसवरील नियंत्रण सूटले. त्यामुळे हा अपघात घडला. अपघातग्रस्त झालेली आरामबस 36 प्रवाशांना घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाली होती. अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. तसेच, तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले.जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा, Mumbai-Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर कार-ट्रकमध्ये समोरासमोर धडक; 9 ठार, 4 वर्षांचे मूल थोडक्यात बचावले)
दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर रायगड जवळील रेपोली गावानजिक झालेल्या अपघातात 9 जण ठार झाले. तर एक जण जखमी झाला. जखमीमध्ये 4 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. इको कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. अपघातामध्ये इको कारमधील 9 जण ठार झाले. 4 वर्षांचे मूल मात्र धक्कादायकरित्या बचावले. त्याच्यावर माणगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. पाठिमागील काही दिवसांपासून या महामार्गावर अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे अपघातांचे नेमके कारण शोधून प्रशासनाने त्यावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. अनेकदा मागणी होऊनही प्रसासन ढिम्म असते. परिणामी नागरिकांना विनाकारण अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागते. अपघातामध्ये अनेकदा मानवी चुका असल्या तरीही रस्त्यांची डागडुजी आणि व्यवस्थापन आणि वापरलेले तंत्रज्ञान हेसुद्धा अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते.