Mumbai Gangrape: धक्कादायक! मुंबईत मित्राच्या पत्नीवर सामुहिक बलात्कार, पतीसह दोघांवर गुन्हा दाखल

मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई कॉलनी परिसरात एका महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Representative Image

Mumbai Gangrape: मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई कॉलनी परिसरात एका महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिल्डिंगमध्ये फ्लॅट देण्याचे आमिष दाखवत दोन जणांनी मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने तिच्या पतीसह दोन मित्रांविरोधात सांगली पोलिस तक्रार केली.मात्र, हे प्रकरण मुंबईतील घाटकोपर येथील असल्याने सांगली पोलिसांनी हे प्रकरण पंत नगर पोलिस ठाण्यात वर्ग केले. पतीच्या सहमतीने महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेला पंत नगर पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले. पोलिस आवश्यक ती कारवाई करतील अशी माहिती वरिष्ठांनी दिली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर येथील रमाबाई कॉलनीत 9 ते 10 डिसेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडली. 10डिसेंबर च्या सकाळी 5 वाजता तिचा पती तिला घेऊन त्याच परिसरातील नवीन बांधलेल्या इमारतीत घेऊन गेला. तिथे त्याचे दोन मित्र होते. त्या मित्रांची ओळख करुन दिली. त्यावेळी पीडितेला दोघांनी बिल्डिंगमध्ये फ्लॅट देण्याचे आमिश दाखवले आणि बारीबारीने तिच्यावर बलात्कार केला.

धक्कादायक म्हणजे पतीकडे राहच्या घराचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते.त्याच्या दोन मित्रांनी त्याला प हजार रुपये देण्याचे वचन दिले. परंतु, त्याच्यासमोर पत्नीशी शारिरीक संबंध ठेवण्यास परवानगी देण्याची अट ठेवली. पीडिताच्या पतीने त्यांची विनंती मान्य केली आणि ठरल्याप्रमाणे तिला घटनास्थळी घेऊन गेला आणि पीडितेचे हात पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर महिला घाबरून माहेरी सांगली येथे निघून गेली. तिथं तिने पतीसह दोघांविरुध्दा तक्रार नोंदवला. परंतु, घटनास्थळ हे पंतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सांगली पोलिसांनी हे प्रकरण वर्ग केले. सांगली पोलिसांनी मूळ एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (1),376 (D), 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला.



संबंधित बातम्या