Mumbai Fresh COVID 19 Guidelines For Ganesh Chaturthi 2021: यंदा मुंबईत घरगुती,सार्वजनिक गणेशोत्सवात 'या' नियमावलीचं असेल गणेशभक्तांवर बंधन
गणेशोत्सवाची गर्दी कोरोनाच्या तिसर्या लाटेला आमंत्रण ठरू नये म्हणून मुंबई पोलिस, पालिका प्रशासन कडून खास नियमावली जारी करण्यात आली आहे.
कोरोनाच्या तिसर्या लाटेचं संकट घोंघावत असताना आता महाराष्ट्रात सणांची रेलचेल सुरू आहे. यंदा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणामध्ये भाविकांची गर्दी लक्षात घेता आता मुंबई महानगरपालिका अॅक्शन मोड मध्ये आली आहे. सध्या मुंबईकरांना कोविड 19 निर्बंधांमधून थोडी सवलत मिळाली असली तरीही गणेशोत्सवातील गर्दी नव्या लाटेला निमंत्रण ठरू नये म्हणून मुंबई पोलिसांनी देखील तयारी सुरू केली आहे. यावर्षी साध्या पद्धतीने सण साजरा करा असं आवाहन करण्यात आले आहे. पण तो साजरा करताना पहा कशी असेल मुंबईकरांसाठी यंदाच्या गणेश चतुर्थी 2021 साठीची नियमावली.
स्पेशल 13 स्कॉड ची मुंबई पोलिसांनी निर्मिती केली आहे. त्यांच्याकडून शहरात नागरिक कोविड 19 नियमावलीचं पालन करत आहेत का? हे पाहिलं जाणार आहे. तसेच नागरिकांनी नियमावलीत राहून सण साजरा करण्याची जबाबदारी या पथकावर असणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनादेखील यंदा कोविड 19 चे नियम पाळूनच सण साजारा करण्याचं आवाहन आहे. भाविकांनी ऑनलाईन दर्शन घ्यावं याची सोय गणेशमंडळांना करावी लागणार आहे. तसेच मंडपात भाविकांना प्रवेश द्यायचा झाल्यास त्याला टोकन द्यावं लागेल आणि भाविकांना दर्शनासाठी वेळ विभागून द्यावी लागणार आहे. Ganesh Chaturthi 2021 Invitation Card In Marathi: गौरी-गणपतीच्या दर्शनाला आप्तजनांना आमंत्रण देण्यासाठी WhatsApp Messages, निमंत्रण नमुने.
गणेशोत्सवामध्ये मूर्ती पर्यावरणपूरक असावी. माती किंवा धातूच्या मूर्तीचं पूजन करावं म्हणजे त्याचं विसर्जन घरच्या घरी करता येऊ शकतं. यंदा घरगुती गणपतींना 2 फीट आणि सार्वजनिक गणपतींना 4 फीटचं बंधन असणार आहे. मात्र गणेश मूर्तीच्या आगमन, विसर्जन सोहळ्याला बंदी कायम आहे. एका वेळी मंडपात 4-5 जणांनाच परवानगी असणार आहे. Ganeshotsav 2021: 'गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा, मार्गदर्शक सूचनांचे पालन करा'- ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आवाहन.
मुंबई मध्ये 13 झोन मध्ये 13 पोलिसांच्या प्रत्येकी एक याप्रमाणे टीम काम करणार आहेत. प्रत्येक टीम मध्ये एक सिनियर पोलिस इन्सपेक्टर, एक एपीआय, दोन पीएसआय, 11 कॉन्स्टेबल्सचा समावेश असणार आहे. या टीम कडून नागरिकांकडून कोविड 19 नियमावलीचे निर्बंध मोडले जात नाहीत ना? यावर लक्ष ठेवले जाणार आहे.