PMC Bank Crisis: पीएमसी बॅंकेचे माजी संचालक जॉय थॉमस, सुरजित अरोरा यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
न्यायालयाने जॉय थॉमस यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसांची वाढ केली आहे.
पंजाब -महाराष्ट्र को-ऑपरेटिव बॅंक (PMC Bank)घोटाळ्याप्रकरणी आज (17 ऑक्टोबर) माजी संचालक जॉय थॉमस यांना मुंबईच्या किला कोर्टात दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने जॉय थॉमस यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसांची वाढ केली आहे. तर माजी संचालक सुरजित अरोरा यांच्या पोलिस कोठडीमध्ये 22 ऑक्टोबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. जॉय थॉमस यांना पीएमसी बॅंकेमध्ये 4355 कोटीच्या घोटाळ्यांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. थॉमस यांना 4 ऑक्टोबर दिवशी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. त्यांच्यावर हाऊसिंग डेव्हलपमेंट इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडला दिलेलं कर्ज RBI पासून लपवण्यात आल्याचे आरोप लावण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांनी इकोनॉमिक ऑफेंसेस विंगने जॉय थॉमसचा संबंध पीएमसी बॅंकेमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये तसेच मागील 7 वर्षांमध्ये 10 प्रॉपर्टीमधील खरेदी सोबतही जोडला आहे. सध्या पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणी HDIL प्रमोटर्स वधवान पिता-पुत्रदेखील अटकेत आहेत. HDIL च्या संचालकांचे अपील, संपत्ती विकून पीएमसी बँकेचे कर्जफेड करा.
ANI Tweet
आरबीआयने लावलेल्या आर्थिक बंधनांनंतर पीएमसी बॅंकेचे खातेदार अडचणीत आले आहेत. खात्यातील रक्कम काढण्याची कमाल मर्यादा सध्या 40,000 इतकी आहे. तसेच कर्ज आणि इतर व्यवहारांवरही बंधनं आहेत.