Mumbai: पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, मढ येथील व्हिलामध्ये सुरु होते शूटिंग
यामध्ये महिलेची सुटका करण्यात आली असून यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
Mumbai: मलाड येथील मढ येथे एका व्हिलामध्ये सुरु असलेल्या पॉर्न शूटिंगचा पर्दाफाश गुन्हे शाखेकडून करण्यात आला आहे. यामध्ये महिलेची सुटका करण्यात आली असून यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचा सुद्धा समावेश असून त्या फोटोग्राफी आणि ग्राफिक्स डिझाइनचे काम करतात. त्यांच्याकडून ओल्ड फेरी मार्ग येथील ग्रीन पार्क बंगल्यात पॉर्न व्हिडिओचे शूटिंग केले जात होते.(धक्कादायक! चिमुकलीच्या खाऊसाठी बायकोने 5 रुपये मागितल्याने चक्क नवऱ्याने घेतला मुलीचा जीव)
सुत्रांनी असे म्हटले की, येथील काही ठिकाणच्या बहुतांश खासगी बंगल्यांसह शॅक्समध्ये वेश्याव्यवसाय आणि पॉर्नचे शूटिंग होतात. तर या टोळीतील दोन महिला मुलींना चित्रपटात काम मिळवून देतो अशी बतावणी करत. यामध्ये पोलिसांनी 25 वर्षीय तरुणीची सुटका केली असून तिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. अन्य पाच जणांच्या विरोधात विविध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पॉर्न शूटिंग करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या बँक खात्यात 36.5 लाख रुपये पॉर्न अॅपच्या सब्सक्रिप्शन मधून जमल्याचे दिसून आले आहे. तसेच व्हिडिओ शूट केल्यानंतर तो अॅपवर अपलोड केला जात असल्याचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी म्हटले आहे. तर या टोळीनेजाहिरात देत त्यात असे लिहिले होते नव्या चेहऱ्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळेल. त्यानंतर जे कोणी यासाठी तयार होत त्यांना बंगल्यावर घेऊन जात त्यांनी जर विचित्र पद्धतीचे शूट केल्यास त्यांना अधिक पैसे दिले जातील असे सांगायचे. त्याचसोबत त्यांच्याकडून एक करार सुद्धा करुन घेतला जात असे. त्यात त्यांना जबरदस्तीने पॉर्न चित्रपटात काम करण्यास भाग पाडले जात होते असे वरिष्ठ पोलीस केदारी पवार यांनी सांगितले.(Nagpur BDSM Sex Death Case: पॉर्न फिल्म बघून सेक्स करण्याचा नादात मृत्यू झालेल्या तरूणाच्या प्रेयसीला जामीन मंजूर)
दरम्यान, तपास करणारे अधिकारी लक्ष्मीकांत साळुंखे यांनी असे म्हटले की आरोपीकडून 5-15 हजार रुपये दिले जात होते. हे पैसे गेल्या दीड वर्षांपासून व्हॉट्सअॅप चॅट्स आणि बँक खात्यातून ट्रान्सफर केले जात असल्याचे ही सांगण्यात आले आहे.