Mumbai Crime: मुंबई चुनाभट्टी परिसरात गुंड पप्पू येरुणकरवर गोळीबार, एकाचा मृत्यू , 3 जण जखमी

या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर तीन ते चार जण जखमी झाले आहेत.

Firing | Representational image (Photo Credits: pixabay)

मुंबईतील (Mumbai Crime) चुनाभट्टी परिसरातील स्थानिक गुंड असलेल्या पप्पू येरुणकरवर (Pappu Yerunkar) गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अंतर्गत वादातून पप्पू येरुणकरवर हा गोळीबार करण्यात आला आहे. त्याच्यासोबत इतर दोन ते तीन लोकांवरही गोळीबार करण्यात आला. जखमींना सध्या सायन रुग्णालयात नेण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चुनाभट्टीतील आझाद गल्ली परिसरात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. (हेही वाचा - Navi Mumbai Shocker: नवी मुंबईत 28 वर्षीय तरुणाकडून आपल्याच सावत्र मुलीवर बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल)

दरम्यान या गोळीबारच्या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. यावेळी 16 राऊंड फायर करण्यात आले आहेत. येरुणकर सोबत तिघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती आहे. या गजबजलेल्या परिसरात सध्या पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर तीन ते चार जण जखमी झाले आहेत.

पप्पू येरुणकरवर अंतर्गत वादातून हल्ला करण्यात आला असल्याची चर्चा आहे. मात्र नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते ठिकाण हे अत्यंत गजबजलेलं आहे. या परिसरात अनेक दुकानं असून त्या ठिकाणच्य सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस तपास करत आहेत.