Mumbai Fire: मुंबईच्या गोरेगाव येथील एका स्टुडिओला आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या (Fire Engines) घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

Fire Breaks Out At A Studio In Goregaon: मुंबईच्या (Mumbai) गोरेगाव (Goregaon) परिसरातील एका स्टुडिओला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या (Fire Engines) घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. यासंदर्भात एएनआय वृत्त संस्थेने माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ज्या स्टुडिओत आग लागली, तिथे आदिपुरूष या चित्रपटाची शुटींग सुरु होती. ज्यावेळी आग लागली तेव्हा दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान घटनास्थळी हजर होता. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, चित्रपट निर्माता प्रसाद सुतार आणि टी-सीरीजचे मालिक भूषण कुमार यांना मोठ्या नुकसानीला समोरे जावा लागले आहे. हे देखील वाचा-Yavatmal: पोलिओ लसऐवजी सॅनिटायझर देण्यात आलेल्या चिमुकल्यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर

एएनआयचे ट्विट-

मुंबईत आज दोन ठिकाणी आग लागली आहे. याआधी आज दुपारी अंधेरी येथील लक्ष्मी प्लाझा इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळणवण्यसाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या ही आग आटोक्यात आली असून तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर येत आहे.