Mumbai Eases Covid-19 Restrictions: मुंबईमध्ये कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता; रात्रीचा कर्फ्यू हटवला, थीम पार्क-स्विमिंग पूल 50 टक्के क्षमतेने सुरु, जाणून घ्या नवे नियम

हे लक्षात घेऊन बीएमसीने मंगळवारी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला

The BrihanMumbai Municipal Corporation (BMC) (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्ण कमी होऊ लागले आहेत. या पार्श्वभुमीवर सरकारने कोविड निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये 90% पेक्षा जास्त लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे आणि 70% पेक्षा जास्त लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे, अशा जिल्ह्यांमध्ये ही सूट देण्यात आली आहे. सरकारने याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मुंबईमध्येही (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या 1 हजाराच्या खाली आहे. अशात शहरात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बीएमसीने (BMC) मुंबईतील निर्बंधामध्ये शिथिलता आणली आहे.

बीएमसीने याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे-

कोरोनाचा संसर्ग सातत्याने कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी मुंबईतील व्यापारी आणि उद्योजकांकडून सातत्याने केली जात होती. हे लक्षात घेऊन बीएमसीने मंगळवारी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सर्व सवलती लोकांच्या लसीकरणाच्या अटींच्या आधारे देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 803 रुग्णांची नोंद झाली असून, आज 1800 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले सध्या शहरामध्ये 8888 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर 485 दिवस झाला आहे.