धारावीत आज 41 जणांची कोरोनची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 1715 वर पोहचला; मुंबई महापालिकेची माहिती
त्यामुळे सरकारकडून कोरोनच्या महासंकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनच्या महासंकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सुद्धा मुंबईतील धारावीत दररोज नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. आज धारावीत 41 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परंतु एकाचा सुद्धा बळी गेला नसल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
धारावीत दाटीवाटीने नागरिक राहत असल्याने तेथे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन अशक्य आहे. परंतु तरीही धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. महापालिका सुद्धा या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची स्क्रिनिंग द्वारे तपासणी करत आहे. दाटीवाटीच्या ठिकाणच्या नागरिकांवर ड्रोनची नजर राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले होते.(मुंबईतील अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण तर 3 जणांवर ICU मध्ये उपचार सुरु)
दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात 2598 जणांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. तर 698 कोरोना संक्रमितांची उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबईत सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. परंतु राज्य सरकारने कोरोनाचा वेग संथ करण्यास जरी यश आले तरीही त्याची साखळी तुटली नसल्याचे स्पष्ट केले आहे.