मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 9 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2643 वर पोहचला,महापालिकेचे माहिती
परंतु मुंबईतील दाटीवाटीने लोकवस्ती असलेल्या अशी धारावीच्या झोपडपट्टीत मात्र कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे.
मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु मुंबईतील दाटीवाटीने लोकवस्ती असलेल्या अशी धारावीच्या झोपडपट्टीत मात्र कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे. धारावीत आज कोरोनाचे आणखी 9 रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2643 वर पोहचला आहे.धारावीत सध्या 87 अॅक्टिव्ह रुग्ण असून 2298 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून धारावीत कोरोनाचा एकही नवा बळी गेला नाही. या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महापालिकेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. त्याचसोबत धारावीत कोविड सेंटर्सची सुद्धा उभारणी करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.
चार महिन्यांपूर्वी धारावी हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र आता धारावीत कोरोना नियंत्रणात आला आहे. रुग्णांची तपासणी करणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना आयसोलेट करणं या उपक्रमामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.(महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरु करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)
दरम्यान,राज्यात काल दिवसभरात 11,088 नव्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद झाली. यासोबत राज्यातील एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा 5,35,601 इतका झाला आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेले 1,48,553 रुग्ण आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 18,306 जणांचाही समावेश आहे. राज्यात काल दिवसभरात 10,014 रुग्ण बरे झाले असून3 लाख 68 हजार 435 रुग्णांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.79 टक्के इतके झाले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.