मुंबईतील 29 धोकादायक पूल महापालिका पाडणार, नागरिकांची कोंडी होणार

महापालिकेकडून (BMC) मुंबईतील पूलांचे परिक्षण करण्यात येत असून 29 धोकादायक पूल लवकरच पाडण्यात येणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सीएसएमटी (CSMT) स्थानकाबाहेरील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी नाहक बळी गेले. तसेच अनेक जण जखमी सुद्धा झाले. मात्र त्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता महापालिकेकडून (BMC) मुंबईतील पूलांचे परिक्षण करण्यात येत असून 29 धोकादायक पूल लवकरच पाडण्यात येणार आहे.

महापालिकेकच्या अखत्यारित 344 पूल आहेत. त्यापैकी 304 पूलांचे ऑडिट करण्यात आले आहे. मात्र परीक्षणानुसार आता पर्यंत 29 पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. तर धोकादायक पूलांमध्ये त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षितेतला प्राधान्य देत धोकादायक पूल पाडण्यात येणार असून त्याची पुर्नबांधणीचे काम करण्यात येणार आहे. त्याचसोबत नागरिकांना या कामाचा त्रास होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेकडून नियोजन करण्यात येणार आहे.(ठाणे येथे कॅसल ब्रिजवरुन खाली पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू)

तर पूलाचे काम रात्रंदिवस करण्यात येणार असून पुर्नबांधणीचे काम लवकर पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मुंबईतील पूल बंद राहणार असल्याने नागरिकांची कोंडी होणार असून त्याचा वाहतूकीवर सुद्धा परिणाम होणार आहे.