IPL Auction 2025 Live

Mumbai's CST Makeover: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या 1930 च्या आयकॉनिक रूपाला धक्का न लावता रूपडं पलटणार; भारतीय रेल्वेची 1600 कोटींची तरतूद

मात्र 1930 सालापासून दगडांपासून बांधण्यात आलेल्या या ब्रिटीशकालीन हेरिटेजला जराही धक्का न लावता हे पुर्नबांधणी करण्यात येणार आहे.

CSMT Station (Photo Credits-Instagram)

मुंबईची ओळख असलेल्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) चा लवकरच कायापालट होणार आहे. मात्र 1930 सालापासून दगडांपासून बांधण्यात आलेल्या या ब्रिटीशकालीन हेरिटेजला जराही धक्का न लावता हे पुर्नबांधणी करण्यात येणार आहे. ही मुंबईकरांसाठी आनंदाची बाब असून लवकरच या स्टेशनचे रुपडं पलटलेल दिसेल असी चिन्हे निर्माण झाली आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या पुर्नबांधणीसाठी भारतीय रेल्वेकडून 1642 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुर्नबांधणीच्या या प्रकल्पामध्ये प्रवाशांना अनेक भिन्न आणि अत्यावश्यक सुविधा देण्यात येणार आहे.

आपली अनेक स्वप्ने घेऊन स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत येणारा प्रत्येक माणसाचे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे पहिले दर्शन घडते. त्याचे ते भव्य दिव्य आणि ब्रिटीशकालीन बांधकाम डोळे दिपवणारे आहे. म्हणूनच मुंबईची ओळख असलेल्या या बांधकामाला जराही धक्का न लावता या स्टेशनचे कायापालट करण्यात येणार आहे. याची प्रक्रिया सुरु देखील करण्यात आली आहे असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.(CSMT Turns 133 Today: व्हिटी ते सीएसएमटी असे झाले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या नावात बदल)

जुन्या रचनेला हात न लावता प्रवाशांना आधुनिक सुविधा परिपूर्ण असलेले रेल्वे स्टेशन हे मुंबईकरांना देणे हे भारतीय रेल्वेपुढे मोठे आव्हान असणार आहे. तसेच प्रवाशांनाही या स्टेशनवरून यात्रा करण्यासाठी थोडे जास्त पैसे मोजावे लागतील असेही सांगण्यात येत आहे.(मुंबईची शान CSMT परिसर होणार फेरीवाले, भिकारी आणि गर्दुलेमुक्त)

TOI ला मिळालेल्या माहितीनुसार, या स्थानकामधील फलाट मोठे करण्यात येणार आहेत. म्हणजेच याची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यासोबतच या स्टेशनकडे येणारे मुख्य प्रवेशद्वार देखील बदलण्यात येणार आहे. दोन टप्प्यांमध्ये याचे काम पूर्ण करण्यात येईल. असेही सांगण्यात येत आहे.