Mumbai Croma Showroom Fire: वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलमध्ये मोठी आग, कोणतीही जीवितहानी नाही

मुंबईच्या वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलमध्ये क्रोमा शोरूममध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कोणतीही जीवितहानी झाली नाही. तपशील येथे वाचा.

Mumbai Croma Showroom Fire | (Photo Credit- X/ANI)

मुंबई (Mumbai Fire) शहरातील वांद्रे पश्चिम येथील लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये (Link Square Mall Fire) असलेल्या क्रोमा शोरूमला भीषण आग (Croma Showroom Fire) लागली. ही घटना मंगळवार पहाटेच्या सुमारास घडली. आगीची तीव्रता इतकी होती की, शोरुममधील साहित्य जळून खाक झाले. ज्यामुळे मोठी वित्तहानी घडली. दरम्यान, दिलासादायक असे की, आगीची भीषणता अधिक असूनही, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीच्या घटनेची बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) पुष्टी केली आहे. आगीची सूचना मिळताच त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे (Fire Brigade Mumbai) 15 बंब घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रमाणात आपत्कालीन मदतकार्य सुरू असल्याने या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली.

आगीच्या घटनेची वेळ आणि तपशील

बीएमसी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉलमधील तीन मजली इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये पहाटे 4.10 च्या सुमारास आग लागली. सुरुवातीला पहाटे 4.19 वाजता लागलेल्या आगीला लेव्हल 1 म्हणून वर्गीकृत करण्यात आले होते, परंतु तीव्रता वाढल्याने ती पहाटे 4.30 वाजता लेव्हल 2 मध्ये अपग्रेड करण्यात आली आणि पहाटे 4.50 वाजता ती आणखी तीव्र घोषित करण्यात आली.  (हेही वाचा, Dharavi Fire: धारावी मध्ये गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रक मध्ये लागली आग; एकापाठोपाठ स्फोट होऊन उडाला भडका (Watch Video))

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्यक्षदर्शींच्या व्हिडिओंमध्ये इमारतीच्या वरच्या भागातून तीव्र ज्वाला आणि काळ्या धुराचे दाट लोट येत असल्याचे दिसून आले. सुरुवातीला तळघरात सुरू झालेली आग लवकरच जमिनीवर आणि वरच्या मजल्यांवर पसरली, ज्यामुळे संरचनेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (हेही वाचा, Mumbai Fire: अंधेरी भागात महाकाली गुंफा भागात भडकली आग (Watch Video))

इमारतीमध्ये तीन तळघर, एक तळमजला आणि तीन वरचे मजले आहेत, ज्यामुळे अग्निशमन दलांसाठी आव्हान निर्माण झाले.

बचाव आणि आपत्कालीन प्रतिसाद

मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलिस, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) यांच्या पथके सध्या घटनास्थळी अग्निशमन आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. आग पूर्णपणे विझविण्यासाठी आणि पुढील नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आगीचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही आणि त्याचा तपास सुरू आहे.

घटनास्थळावरुन आकाशात धुराचे लोट

बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर-ए-हिंद इमारतीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात आणखी एक मोठी आग लागल्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली आहे. रविवारी पहाटे २:३० च्या सुमारास लागलेल्या आगीची नोंद पहाटे ३:३० पर्यंत दुसऱ्या दर्जाची आग म्हणून करण्यात आली. पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत लागलेली आग विझविण्यासाठी आठ अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement