Mumbai Crime News: उपद्रवी तरुणांचा ऑन ड्युटी पोलिसांवर हल्ला, सायन येथील घटना कॅमेरात कैद

मुंबईतील सायन भागातून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात काही उपद्रवी तरुण मंडळी दोन पोलिसांना मारहाण करत आहे.

Mumbai Crime News: उपद्रवी तरुणांचा ऑन ड्युटी पोलिसांवर हल्ला, सायन येथील घटना कॅमेरात कैद
Mumbai crime news

Mumbai Crime News: मुंबईतील सायन भागातून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात काही उपद्रवी तरुण मंडळी दोन पोलिसांना मारहाण करत आहे. तरूण मंडळी पोलीसांना ऑन डयुटी शिवीगाळ करत आहे. हा सर्व प्रकार कॅमेरा रेकॉर्ड करण्यात आला आहे. मारामारी करत असताना कोणीही यात हस्तक्षेप करत नाही. स्थानिक यात फक्त बघण्याची भुमिका पार पाडत आहे.  तर काही लोक तरुणांना समजवण्याचा प्रयत्न करत आहे.  व्हिडिओत दिसल्याप्रमाणे तरुण वाद घालताना पोलीसांना वर्दीचा फायदा घेत असल्याचे बोलत आहे.

या घटनेत एक विद्यार्थी जखमी झाला आहे. सद्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री उशीरा पर्यंत ही घटना सुरु होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी हा व्हिडिओ शेअर केले आणि नंतर इतर अनेकांनी देखील शेअर केले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संतापाची भुमिका घेतली आहे. बुधवारी असाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर याच पार्श्वभुमीवर ही घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणात सायन पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. लवकर यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2023 12:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).