Mumbai Crime News: पोटच्या मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आई आणि तीच्या मित्राला अटक,दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबईत पाच वर्षांच्या मुलावर त्याचीच आई आणि तिच्या मित्राने अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mumbai Crime News: मुंबईत (Mumbai) पाच वर्षांच्या मुलावर त्याचीच आई आणि तिच्या मित्राने अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान मुलाच्या शरीरावर भाजल्याच्या खुणा आहेत. मुलावर सध्या वाडिया रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.प्राणघातक हल्ला आणि खुनाचा प्रयत्न केला प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खलबळ उडाली आहे.
निलम विनोद धाडवे आणि तिचा मित्र अक्षय कमलाकर गावड यांना तात्काळ दहिसर पोलिसांनी अटक केली. मीडिया रिपोर्टनुसार, निलम ही मोलकरीण म्हणून काम करते. दहिसरच्या कोकणीपाडा, जया भवानी सोसायटीतीत अक्षय आणि पाच वर्षाच्या मुलासोबत राहते. विनोद विष्णू धाडवे सोबत २०१७ मध्ये निलमने लग्न केले. परंतु नवरा बायकोचं नात हे जास्त वेळ टिकू शकले नाही, त्यामुळे पतीच घर सोडून ती मुंबईत अक्षय सोबत राहायची. आरव असं पीडीत मुलाचे नाव आहे.
विनोदची आईची आरवची काळजी घेत होती. पंरतू निलमने तीच्यावर काळजी न घेत असल्याचा आरोप करत आरवला मुंबईला घेवून आली, विनोदने २५ सप्टेंबर रोजी आरवच्या तब्येतीसाठी एका नातेवाईकाला फोन केला होेता तेव्हा आरव रुग्णालयात असल्याचं त्याला समजले. विनोदने या प्रकरणात दहिसर पोलिस ठाण्यात मुलाला मारहाण आणि जीवेघेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी निलम आणि अक्षय यांची तक्रार केली. दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.