Mumbai Crime News: मोबाईलच्या वादातून बहिणींचे केस कापले! हल्लेखोर भावाला अँटॉप हिल पोलिसांकडून अटक

अँटॉप हिल पोलिसांनी एका तरुणाला त्याच्या दोन चुलत बहिणींना मारहाण केल्या प्रकरणी आणि त्यांची केस कापल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

Representational picture. Credits: Pixabay

Mumbai Crime News: मोबाईलच्या वारंवार वापरामुळे झालेल्या वादातून तरुणाने त्याच्या दोन चुलत बहिणींना मारहाण केल्याची आणि त्यांची केस कापल्याची (Chopped Sisters hair) घटना वडाळ्यातून समोर आली आहे. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे. ऋषभ रुद्रम्मा असे आरोपीचे नाव असून तो अँटॉप हिल येथील रहिवासी आहे. 13 जून रोजी हे प्रकरण उघडकीस आले. दोन्ही चुलत बहिणींचे वय 15 आणि 20 वर्षे आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

20 वर्षीय तरुणीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीत तरूणीने म्हटले की, ती तिच्या बहिणीसह ॲन्टॉप हिल येथील विजयनगर परिसरात ऋषभ रुद्रम्मा आणि त्याच्या वडिलांसोबत राहते. दोघींच्या वडिलांचे 2019 मध्ये निधन झाले होते. आर्थिक अडचणींमुळे 2021 पासून त्या तेथे राहत होत्या.

12 जून रोजी मोठी बहिण फोनवर बोलत असताना रुद्रम्मा तेथे आला. तिला फोनवर कोणाशी बोलत आहे? असे विचारले. त्यावर तिने त्याला मुलाशी बोलत आहे असे सांगितले. त्या मुलासोबत भविष्यात ती लग्न करणार असल्याचे तिने सांगितले. त्यावर चिडलेल्या रुद्रम्माने तिला हे सगळे थांबवण्यास सांगितले आणि तिने तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्याशिवाय, रागाच्या भरात त्याने तिला मारहाणही केली. त्यानंतर तो लहान बहिणीकडे वळला आणि तिला याबद्दल माहिती आहे का? असे विचारले आणि तिलाही मारहाण केली.

या मारहाणीत मोठी बहिण जमिनीवर कोसळली आणि त्यापाठोपाठ त्याने लहान बहिणीलाही फरशीवर आपटले. यात लहान बहिण बेशुद्ध झाली. त्यानंतर त्याने कात्री घेऊन दोघींची केस कापली. केस कापताना, रुद्रम्माने कथितपणे सांगितले की 'या लाजिरवाण्या केशरचनामुळे तुम्ही दोघी घराबाहेर पडण्याचे धाडस करणार नाही'. त्यावर मोठ्या बहिणीने आरडाओरडा केला. ते ऐकून शेजारी धावत आले. त्यांनी रुद्रमाला थांबवले आणि धाकट्या बहिणीच्या चेहऱ्यावर पाणी टाकून तिला शुद्धीवर आणले.

शेजाऱ्यांनी कथितपणे मोठ्या बहिणीला पोलिसांशी संपर्क साधून रुद्रम्माविरुद्ध तक्रार नोंदवण्यास सांगितले. एफआयआरनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक भागवत गरंडे यांनी कारवाई करत रुद्रम्माला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. आरोपीला 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रुद्रम्मावर कलम 323 , 324 , 504, 506 (2) कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif