Versova Crime: लग्नाआधी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या तरुणीवर प्रियकराचा जीवघेणा हल्ला
वर्सोवा परिसरात राहणाऱ्या 18 वर्षीय तरुणीचं 26 वर्षीय तरुणासोबत लग्न होणार होतं. दोघांच्या लग्नाची घरात बोलणी सुरू होती.
राज्यात सध्या गुन्हेगारीच्या घटनेत वाढ झाली असून विशेषकरुन महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. मुंबई (Mumbai City) सारख्या महानगरात देखील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत होणारी वाढ ही चिंतेची बाब आहे. अत्याचाराच्या घटनेला विरोध करणाऱ्या आरोपींकडून मारहाणीच्या घटनाही घडत असल्याचे समोर आले असून मुंबई शहरातील वर्सोवात देखील असाच प्रकार समोर आला आहे. शरीरसुखाची मागणी नाकारल्याच्या रागातून एका 18 वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. वर्सोवा (Varsova) परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 26 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल हा करण्यात आला आहे. (हेही वाचा - Mumbai Drugs News: मुंबई विमानतळावरून युगांडाच्या व्यक्तीला 7.85 कोटी रुपयांच्या कोकेनसह अटक)
वर्सोवा परिसरात राहणाऱ्या 18 वर्षीय तरुणीचं 26 वर्षीय तरुणासोबत लग्न होणार होतं. दोघांच्या लग्नाची घरात बोलणी सुरू होती. त्याचवेळी मित्राच्या रूमवरून सामान आणण्याच्या बहाण्याने आरोपी तरुणाने तरुणीला फोन करून बोलावून घेतलं. तरुणी रूमवर आल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने या सर्व गोष्टीला विरोध केला. त्यामुळे रागाच्या भरात आरोपी तरुणाने तिला बेदम मारहाण केली.
याप्रकरणी वर्सोवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. सध्या पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2023 12:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

