MBVV Police: महिलेसह चार मुलांची हत्या, प्रकरणाला 28 वर्षांनी फुटली वाचा, आरोपीला अटक

राजकुमार चौहान (Rajkumar Chauhan) नामक असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी (MBVV Police) ही कारवाई केली

Rajkumar Chauhan | (Photo Credit - Twitter/ANI)

मीरा भाईंदर (Mira Bhayandar Vasai Virar) परीसरात काशिमीरा (Kashimira) येथे 28 वर्षांपूर्वी घडलेल्या एका सनसनाटी हत्या प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली आहे. राजकुमार चौहान (Rajkumar Chauhan) नामक असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी (MBVV Police) ही कारवाई केली. एक महिला आणि तिच्या चार मुलांची हत्या झाल्याने त्या वेळी मोठी खळबळ माजली होती. पोलीस दप्तरी नोंद झाल्यापासून हे प्रकरण तपासावर होते. 28 वर्षांपूर्वी घडलेले हे थरारक प्रकरण जुने झाल्याने लोकांच्या विस्मरणात गेले होते. मात्र, पोलीस दप्तरी नोंद झालेली कोणतीच घटना विस्मरणात जात नाही, हे पुन्हा एकदा या निमित्ताने पुढे आले आहे.

काशिमीरा परिसरात 1994 मध्ये घडलेल्या या थरारक हत्या प्रकरणात राजकूमार चौहान याच्यासह आणखी दोघे अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून हे तिघेही पोलिसांच्या रडारवर होते. दरम्यान, इतक्या वर्षांनंतर राजकुमार चौहानला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. याच प्रकरणात पोलिसांना हवे असलेले राजकुमार चौहान याची दोन भावंड अनिल आणि सरोज अद्यापही फरार आहेत. (हेही वाचा, Nagpur: 1979 मध्ये गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला तब्बल 43 वर्षांनी अटक; जाणून घ्या कसा लागला छडा)

अविराज कुराडे मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयात गुन्हे शाखेचे (युनिट I) वरिष्ठ निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. या वेळी त्यांनी या विभागात तपास प्रलंबीत असलेल्या गुन्ह्यांची यादी मागवली होती. या गुन्ह्यांतील यादीनुसार त्यांनी तपास करण्यास सुरुवात करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार 28 वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याची उकल झाली. या प्रकरणातील आरोपींपैकी पहिली अटक झाली.

काय आहे प्रकरण?

जागरणदेवी प्रजापती (वय 27) आणि तिच्या चार मुलांची हत्या करण्यात आली होती. ज्यात तिच्या तीन महिन्यांच्या तान्ह्या मुलाचाही समावेश होता. मानवतेचा थरकाप उडवेल अशी एकूण 11 अत्यंत क्रुर प्रकरणे वसई विरार आयुक्तालयात गुन्हे शाखा युनिटमध्ये आढळून आली. पोलीसांकडील माहितीनुसार जागरणदेवी प्रजापती हिच्या पतीचे 2006 मध्ये निधन झाले आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक कुराडे यांनी दिली.

दरम्यान, पोलिसांनी केलल्या तपासात या प्रकरणातील (जागरणदेवी प्रजापती हत्या) सर्व आरोपी हे उत्तर प्रदेश राज्यातील असल्याचे पोलीसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एक टीम राज्यात (यूपी) 2021 मध्ये पाठवली होती. या टीमने यूपी स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने आरोपींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती, असे कुराडे म्हणाले.

पोलीस आरोपींच्या मागावर होते. दरम्यान, प्रकरणातील एक आरोपी राजकुमार चौहान उर्फ कालिया हा कतार येथे राहत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्याच्या पासपोर्टची माहिती मिळवून त्याच्याविरुद्ध एक लुक आउट सर्कुलर जारी केले. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की, तो गुरुवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला आहे. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले.

ट्विट

पोलीस तपासात पुढे आले की, एकदा आरोपींनी जागरणदेवी हिचा हात धरुन विनयभंग केला होता. त्यावरुन महिलेचा (जागरणदेवी) पती आणि आरोपींमध्ये जोरादर भांडण झाले. त्यानंतर आरोपींनी पुन्हा एकदा तेच कृत्य केले. त्यानंतरही दोन्ही बाजूंमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी महिलेचा पती बाहेर गेला असता घरात घुसून तिची आणि तिच्या चारही मुलांची हत्या केली.