IPL Auction 2025 Live

Mumbai Crime Branch कडून अंधेरी मध्ये कॉल सेंटर वर छापेमारी; विनापरवाना अमेरिकन नागरिकांना विकत होता औषधं!

अंधेरी पूर्व भागात मेट्रो स्टेशन जवळ Omkar Summit Business Bay इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर याचे कार्यालय होते.

Arrest | (Representative Image)

मुंबई क्राईम ब्रांच (Mumbai Crime Branch) ने अंधेरी (Andheri) भागात धाड टाकून एका कॉल सेंटर (Call Center) मधून 10 जणांना अटल केली आहे. या आरोपींना काल कोर्टातही दाखल केले होते. दरम्यान कोर्टाने सार्‍या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. क्राईम ब्रांचच्या युनिट 10 ला मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. ग्लोबल सर्विसच्या नावाखाली हे कॉल सेंटर चालवले जात होते. अंधेरी पूर्व भागात मेट्रो स्टेशन जवळ Omkar Summit Business Bay इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर याचे कार्यालय होते.

क्राईम ब्रांचच्या अधिकार्‍यांना मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यालयामध्ये कर्मचारी आपण अमेरिकन असल्याचे सांगत होते आणि Viagra, Cialis, Levitra, tramadol अशी औषधं विना परवाना अमेरिकन नागरिकांना विकत होती. त्यामुळे भारत सरकारला आर्थिक नुकसान होत होते. ही औषधं मुंब्रा येथील रहिवासी असलेला सलमान मोटारवाला विकत होता.

रेड दरम्यान Irfan Qureshi, Salman Motorwala आणि Rashid Ansari यांनी व्हीसी डायलर सर्व्हर बंद केला आणि गुगल क्रोममधून V3global@TL नावाची फाईल डिलीट केली. नक्की वाचा: Mumbai Crime: मुंबई पोलिसांकडून सव्वा कोटीचे कोकेन जप्त, एका नायजेरियन व्यक्तीला अटक .

गुन्हे शाखेने छापा टाकून साकिब सय्यद (38), यश शर्मा (26), उजेर शेख (26), गौतम महाडिक (27), जुनेद शेख (22), जीवन गौंडा (22), मुनीब शेख (40), हुसेन शेख (21), विजय कोरी (38) आणि मोहम्मद सुफियान मुकादम (20) यांना अटक केली.

सर्व अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्व आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपीच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, ही अटक चुकीची आहे आणि त्यासाठी त्यांनी अर्नेश कुमार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा हवाला दिला आहे.