High Profile Prostitution Racket In Mumbai: जुहू च्या थ्री स्टार हॉटेल मध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; Mumbai Crime Branch ची कारवाई
ता धाडीमध्ये काही मालिका मध्ये काम करणार्या अभिनेत्री आणि मॉडेलची सुटका करण्यात आली आहे.
मुंबई क्राईम ब्रांच (Mumbai Crime Branch) कडून एक High Profile Prostitution Racket उघडण्यात आलं आहे. ही कारवाई जुहूच्या एका थ्री स्टार हॉटेल मध्ये करण्यात आली आहे. यामध्ये एका 32 वर्षीय मॉडेलला अटक करण्यात आली आहे. ता धाडीमध्ये काही मालिका मध्ये काम करणार्या अभिनेत्री आणि मॉडेलची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, युनिट 7 चे अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई एका टीप वरून केली आहे. यामध्ये इशा खान हाय प्रोफाईल रॅकेट चालवत असून अॅक्टर आणि मॉडेल पुरवले जातात असा दावा करण्यात आला होता. एक डमी कस्टमर खान कडे गेला त्याच्याकडून खान ने 4 लाखांची मागणी केली.
ANI Tweet
काही मीटींग पार पडल्यानंतर खान कडून गुरूवारी मुंबईच्या जुहू भागात असलेल्या एका थ्री स्टार हॉटेल मध्ये मिटिंग करण्याचं ठरलं. मग क्राईम ब्रांच च्या अधिकारी, कर्मचार्यांनी आपला सापळा रचला. खान 2 महिलांना घेऊन तेथे पोहचली.
द फ्री प्रेस जर्नल च्या रिपोर्ट्स नुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही खानला संबंधित कलमांखाली ताब्यात घेतलं.पुढील तपासासाठी सांताक्रुझ पोलिस स्टेशन मध्ये पाठवले. तर सुटका करण्यात आलेल्या महिलांना मानखुर्द रिमांड होम मध्ये पाठवण्यात आले आहे.