Mumbai Crime: दिवसेंदिवस मुंबईत गुन्हेगारी वाढत चालले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मुंबई शहरातील पवई परिसरातील एका 30 वर्षीय व्यक्तीला पंतनगर पोलिसांनी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी घाटकोपर येथे घडली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आकाश सहजराव असं आरोपीचे नाव होते. पीडित बुधवारी घाटकोपर पश्चिम येथील कामराज नगर बसस्थानकावर होती तेव्हा ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आकाशने २० वर्षीय पीडीत तरुणीला बसस्थानकावर छळास सुरुवात केली. तीला पुढे जाण्यास रोखले आणि तिला एकांतांत भेटण्यासाठी बोलावले. तरुणीसोबत आणखी एक सहकारी होता. पीडित तरुणीने नकार दिल्यावर त्याने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घटनास्थळावरून तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला बळजबरीने रोखले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आरोपीने पीडिताला चापट मारली. पीडितेचा सहकारी त्याने देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा-साकीनाका बलात्कार प्रकरणाचे CCTV Footage; पीडितेला मारहाण करताना दिसला आरोपी
सहकारीला देखील आरोपीने मारहाण केली. पीडिताने घटलेला प्रकार गुरुवारी पोलिसांना सांगितले. आरोपी आकाश विरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला गेला. पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश हा काहि दिवसांपासून पीडितेचा पाठलाग करत होता. पीडितेने अनेकदा नकार देऊन तो तिचा पाठलाग करत राहिला. आकाशला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.